शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सेवानिवृत्त पोलिसाजवळ सापडला चोरीचा मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:06 IST

दोन वर्षापूर्वी बसस्थानकातून चोरी गेलेला मोबाईल शिवाजीनगर ठाण्यातील निवृत्त सहायक फौजदाराजवळ सापडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करून संबंधित पोलिसाला बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देएलसीबीच्या तपासातून उघड : मोबाईल चोरला नसून सापडल्याचा कांगावा

बीड : दोन वर्षापूर्वी बसस्थानकातून चोरी गेलेला मोबाईल शिवाजीनगर ठाण्यातील निवृत्त सहायक फौजदाराजवळ सापडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करून संबंधित पोलिसाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई सपोनि अमोल धस व त्यांच्या चमूने केली. आपण मोबाईल चोरला नसून तो सापडल्याचा कांगावा हा पोलीस करीत असल्याचे सूत्रांकडून समजते.रमेश विश्वनाथ गायकवाड (६० रा.गोविंदनगर, बीड) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या निवृत्त सहायक फौजदाराचे नाव आहे. २०१७ साली एका व्यक्तीचा बीड बसस्थानकातून एक महागडा मोबाईल चोरीला गेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला. शिवाजीनगर पोलिसांनी याचा तपास करण्यास अनुत्सुकता दाखविली. यावेळी याच ठाण्यात रमेश गायकवाड सुद्धा कार्यरत होते. मोबाईल सापडत नसल्याने शिवाजीनगर पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र स्थानिक गुन्हे शाखा या चोरट्यांच्या मागावरच होती. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा चोरीचा मोबाईल सुरू झाल्याचे सपोनि अमोल धस यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सापळा लावत मोबाईलमध्ये टाकलेल्या सीमकार्डवर कॉल केला. काहीतरी कारण सांगून त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतले आणि खात्री पटताच बेड्या ठोकल्या. गायकवाड यांच्याकडून मोबाईलसह सीमकार्ड जप्त केले आहे. त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोउपनि मोहंमद काझी हे तपास करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस व त्यांच्या चमूने केली. दरम्यान, एलसीबीकडून गायकवाड यांचा चोरट्यांशी संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.जमा का केला नाही ?गायकवाड यांनी आपल्याला हा मोबाईल बसस्थानकात सापडल्याचे सांगितले आहे. मात्र जर तो सापडला होता तर ठाण्यात जमा का नाही केला, त्यात सीमकार्ड का टाकले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे पोलीस असल्यामुळे यातील चांगल्या वाईट परिणामांची त्यांना जाणीव असूनही त्यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.पोलिसांची प्रतिमा मलीनआष्टी येथील बाळू खाकाळ खून प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आरोपींना सहकार्य केल्याने सात वर्ष कारागृहात काढले. शेवटी तो त्यातून निर्दाेष सुटला. त्यानंतर आता गायकवाड नामक स.फौजदाराजवळ चोरीचा मोबाईल मिळाला आहे. अशा घटनांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत चालली आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसMobileमोबाइल