शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीत चोरी; साडेपाच लाख रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:08 IST

विद्युत प्रवाह बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी ट्रान्सफर्मरमधील कॉपरचे साहित्य लंपास केले

- मधुकर सिरसट केज (बीड) : तालुक्यातील लव्हुरी शिवारातील लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सुतगिरणीमध्ये चोरीची घटना बुधवारी २८ डिसेंबर रोजी उघडकीस आली.  येथे स्वखर्चातून बसविलेल्या विद्युत ट्रान्सफर्मरमधील कॉपरचे 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

लव्हूरी शिवारात माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सतगिरणी उभारणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. येथे विद्युत पुरवठा करण्यासाठी इस्लामपूर (  जि. सांगली) येथून पॉवर ट्रान्सफर्मर व इतर साहित्य सुतगिरणीने स्वखर्चातून खरेदी केले. हे साहित्य डिसेंबर २०२१ दरम्यान सूतगिरणीच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूला ईलेक्ट्रीक विभागात बसवले होते. सध्या या ट्रान्सफार्मरला विद्युत प्रवाहाची जोडणी केलेली नाही. दरम्यान, ७ डिसेंबर २०२२ रोजी कार्यकारी संचालक अनिल पाखरे व लेखाधिकारी विठ्ठल मुळे यांच्या तपासणीत साहित्य सुस्थितीत होते. 

दरम्यान, विद्युत प्रवाह बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी  ट्रान्सफर्मरमधील 6 कॉपर कॉइल्स, 800 किलो वजनाचे एपीएफसी पॅनलमधील कॉपर साहित्य व केबल असे 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. बुधवारी 28 डिसेंबर रोजी साहित्य चोरीस गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी लेखाधिकारी विठ्ठल मुळे यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात आज गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड