शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

भावंडाना वाचविण्यासाठी तरुणाची भीषण आगीत उडी; मात्र सिलेंडरच्या स्फोटात गमावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:56 IST

लहान बहिण-भावाला आगीतून वाचवताना गॅस टाकीच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू

धारूर ( बीड) : गोठ्यास लागलेल्या भीषण आगीत अडकलेल्या लहान बहिण आणि भावास वाचविताना तरुणाचा सिलेंडरच्या स्फोटात मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंपरवाडा येथे शेत वस्तीवर घडली. रवी श्रीहरी तिडके ( २१ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

तालुक्यातील पिंपरवाडा गावापासून अर्धा किमी अंतरावर उत्तरेस श्रीहरी कारभारी तिडके व रामकिसन कारभारी तिडके या दोघा भावांचे शेतात पत्र्याचे शेड आणि जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यास दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी एका घरात लहान बहिण व भाऊ अडकले. हे पाहून आग विझवण्यासाठी श्रीहरी तिडके यांचा मुलगा रवीने धाव घेतली. गोठयाजवळील टाकीतील पाणी घेऊन रवी आत शिरला. मात्र, अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.

या स्फोटात सिलेंडरचा पत्रा उडून रवीच्या मानेला लागला. यात गंभीर जखमी झाल्याने रवीच्या जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुण मुलाच्या मृत्यूची वार्ता गावात पसरल्याने  हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड