शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'काळ आला होता पण...'पुलावरून खाली कोसळला पिकअप; पोलिसांच्या सतर्कतेने चालक सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 13:04 IST

पैठण बारामती रोडवर कडानजीक पिकअप गेला पुलाच्या खाली

- नितीन कांबळे कडा ( बीड) - वेळ आज पहाटे अडीज वाजेची शेवगाववरून कांदा भरून एक पिकअप कडा येथील येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येत होता. पैठण बारामती रोडवरील कडा नजीक अचानक चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पुलावरून खाली कोसळले. याच वेळी पेट्रोलिंग करत असलेल्या कडा पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत चालकाल बाहेर काढले. यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. हा प्रसंग पाहून काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचीती आली. 

शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील सोमनाथ कचरू जाधव हा मंगळवारी रात्री पिकअप ( क्रमांक एम.एच २०,डी.ई.६८९९) मध्ये कांदा गोण्या घेऊन कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पैठण बारामती रोडने येत होता. कडा नजीक येताच चालकाला झोप लागल्याने अनियंत्रित पिकअप पुलाच्या खाली गेले. यात चालक वाहनात अडकून पडला. 

याचवेळी नाईट राऊड पेट्रोलिंग करत असलेले कडा पोलिस चौकीचे हवालदार बाबासाहेब राख, वाहन चालक प्रदिप घोडके यांना हे दृश्य दिसले. त्यांनी लागलीच अपघातग्रस्त वाहनाकडे धाव घेतली. प्रयत्न पूर्वक पोलिसांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या सतर्कतेने जाधवचे प्राण वाचले. भल्या पहाटे पोलिस देवाच्या रूपात पुढे उभा ठाकल्याने मला जिवदान मिळाल्याची प्रतिक्रिया चालक सोमनाथ जाधव याने दिली.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड