शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाचवा वाचवा! जीवाच्या आकांताने काका धावत होते, पुतण्याने गाठून कोयत्याने केले सपासप वार

By संजय तिपाले | Updated: November 26, 2022 12:39 IST

पहाटेचा थरार, पुतण्याने घरात घुसून केला काका-काकूवर हल्ला, काकाचा मृत्यू तर इतर तिघे गंभीर जखमी

बीड: वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे कौटुंबिक वादातून चुलत्याने पुतण्याचा खून केल्याच्या घटनेला ४८ तासही उलटत नाहीत तोच बीड तालुक्यातील मुळूक येथे शेतीवादातून धारदार कोयत्याने सपासप वार करुन वृध्द चुलत्याचा खून केल्याची घटना २६ नोव्हेंबरला पहाटे घडली. अन्य चौघे जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बळीराम मसाजी निर्मळ (७५) असे मयताचे नाव आहे. त्यांच्या पत्नी केशर बळीराम निर्मळ (६५), चोकाजी  निर्मळ (८०), कांताबाई निर्मळ (६०) हे जखमी आहेत. रोहिदास विठ्ठल निर्मळ हा बळीराम यांचा पुतण्या आहेत. निर्मळ कुटुंबीयांमध्ये शेतीवरुन वाद सुरु होता. यातून २६ नोव्हेंबरला पहाटे बळीराम यांच्यासह पत्नी केशर यांच्यावर रोहिदास याने कोयत्याने हल्ला चढविला. जीव वाचविण्यासाठी बळीराम हे घरातून बाहेर धावत सुटले. रस्त्यावर गाठून रोहिदासने सपासप वार केल्याने जे जागीच मृत्यमुखी पडले.यावेळी वाद सोडविण्यास आलेल्या चोकाजी व कांताबाई निर्मळ यांनाही त्याने मारहाण केली. 

दरम्यान, यानंतर बळीराम यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सोडून रोहिदाने पोबारा केला. ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेतून चारही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यापैकी केशर निर्मळ या गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक विलास जाधव, अजय पानपाटील, अंमलदार दत्तात्रय बळवंत , गोविंद राख, सचिन मुरुमकर यांनी घटनास्थळी भेट दिली. 

आरोपीच्या मागावर पथकेदरम्यान, घटनास्थळी रक्ताने माखलेला कोयता आढळून आला, तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आरोपी रोहिदास निर्मळ हा फरार असून त्याच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड