शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

जीर्णोद्धाराचे काम युध्द पातळीवर, भाविकांना शेडमध्येच घ्यावे लागणार पुरूषोत्तमाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 14:29 IST

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने शेडमध्ये ठेवली मूर्ती 

- पुरुषोत्तम करवामाजलगाव:  पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाच्या मंदिराच्या जीर्णोदराचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे आठ दिवसांवर आलेल्या अधिक मासात भाविकांना मंदिरा ऐवजी शेडमध्येच पुरूषोत्तमाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

भारतात एकमेव असलेल्या पुरुषोत्तमाच्या मंदिराचे काम मागील दोन महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून करोड रुपये खर्च करण्यात येत आहेत. १८ जुलै रोजी अधिक मास ( धोंड्याचा महिना ) सुरू होत आहे. भारतात एकमेव माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तम पुरी येथे पुरुषोत्तमाचे मंदिर आहे. या महिन्याभराच्या कार्यकाळात संपूर्ण भारतातून लाखोच्या संख्येत भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.मंदिराच्या जीर्णोदराचे काम सुरू असल्याने व भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर ट्रस्टच्यावतीने एका रिकाम्या जागेत भव्य असा शेड उभा करण्यात आला आहे. या शेडमध्ये भाविकांना दर्शन घेता येणार आहे . पावसाळ्याचे दिवस असल्याने व या ठिकाणी रस्ते नसल्यामुळे चिखल मोठ्या प्रमाणात होणार असल्याने भाविकांची मात्र तारांबळ होणार आहे.

या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने बैठक घेण्यात आली असली तरी या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने भाविकांना या ठिकाणी जाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. यावर प्रशासनाने कसल्याच प्रकारची उपाय योजना न केल्याने भाविकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी दिसून येत आहे.

भाविकांसाठी शेड उभारले पुरुषोत्तमाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.  अधिक मास महिना सुरू होत असल्याने व भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही भव्य असे शेड उभा केले आहे. या शेडमध्ये भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता येणार आहे.- विजय गोळेकर,अध्यक्ष, पुरुषोत्तम मंदिर 

टॅग्स :Beedबीडspiritualअध्यात्मिक