शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

बीडचा नवा 'आका', खोक्याच्या घरावर पोलिसांचा छापा; काय-काय सापडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 20:02 IST

खोक्याचे नवनवे कारनामे समोर येऊ लागल्यानंतर सुरेश धस यांचीही राजकीय कोंडी झाल्याचं दिसत आहे.

Beed Crime: गुन्हेगारी घटनांमुळे मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आणखी एका गुन्हेगाराचे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या याचे नवनवे प्रताप समोर येत आहेत. खोक्याकडून एका व्यक्तीला अर्धनग्न करून मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो वन्यप्राण्यांची शिकार करत असल्याचीही माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर आज वनविभागाने पोलिसांसह खोक्याच्या घरावर धाड टाकली. या धाडीत शिकारीच्या साहित्यासह धारदार शस्त्रेही आढळून आल्याचे समजते.

पोलिसांनी आज सतीश भोसले याच्या घरी टाकलेल्या धाडीत मोर आणि हरीण पकडण्यासाठी लागणारी जाळी, वाघोर, धारदार शस्त्र आणि वन्य प्राण्यांचे मांसही जप्त केल्याची माहिती आहे. सतीश भोसले याने यापूर्वी अनेकदा प्राण्यांची शिकार केल्याचं बोललं जात आहे. परंतु त्याचे आता विविध व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागालाही जाग आली असून त्याच्याभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे.

खोक्यामुळे सुरेश धसही अडचणीत

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून भाजपचे आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी मोठ्या प्रमाणात रान उठवलं होतं. देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची राजकीय शक्ती उभी असल्याचा आरोप आमदार धस यांनी केला होता. परंतु बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात दहशत निर्माण करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचं उघड झालं आहे. खोक्याचा एकएक कारनामा समोर येऊ लागल्यानंतर सुरेश धस यांचीही राजकीय कोंडी झाल्याचं दिसत आहे. सतीश भोसले कुख्यात गुन्हेगारसतीश भोसले हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात बीड व अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ६ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये विवाहितेचा छळ करणे, अपहरण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे आदींचा समावेश आहे.

टॅग्स :BeedबीडSuresh Dhasसुरेश धसCrime Newsगुन्हेगारीbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण