शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 19:15 IST

छाननी दरम्यान दहा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वेगवेगळ्या कारणाने अवैध ठरविण्यात आले.

परळी (बीड) : परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ५८ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परळीचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांच्याकडे दाखल केले होते. या ५८  उमेदवारांच्या ७२ उमेदवारी अर्जाची बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात छाननी झाली. छाननी दरम्यान दहा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वेगवेगळ्या कारणाने अवैध ठरविण्यात आले. तर ४८ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी परळी विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहेत.

नामनिर्देशन पत्र अवैध ठरलेल्यामध्ये एजाज  इनामदार, अलका सोळंके, करुणा मुंडे, शंकर शेषराव चव्हाण, अन्वर पाशा शेख व आवेसोदीन जलीलमिया सिद्दिकी ,दत्ता किसन दहिवाळ, श्रीकांत चंद्रकांत पाथरकर, रमेश फड यांच्या अर्जाचा समावेश आहे.

सूचक म्हणाले, सही आमची नाहीकरुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्तीसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जामध्ये सूचकांच्या नावा पुढे केलेल्या सह्या आपल्या नसल्याचे सुचकांनी आजच्या नामनिर्देशनपत्र छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले.  त्यामुळे करुणा मुंडे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. 

मनसेच्या आधी एकाची माघार, आता दोघांचे अर्ज बादया मतदारसंघातून अभिजीत देशमुख यांना मनसेनेअधिकृत उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रणांगणातून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे मनसेच्या वतीने दत्ता दहिवाळ व श्रीकांत पाथरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी नामनिर्देशन पत्र अपूर्ण भरले होते. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय दहिवाळ यांनी नामनिर्देशन पत्र भरताना डिपॉझिटची रक्कम भरली नव्हती. या कारणामुळे मनसेच्या दोघा उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. तसेच भारतीय जवान किसान पार्टीचे शंकर चव्हाण यांचाही नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले आहेत. 

यांचे अर्ज ठरले वैध: महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धनंजय पंडितराव मुंडे, महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (श.प )पार्टी चे उमेदवार राजेसाहेब श्रीकिशन  देशमुख, अपक्ष उमेदवार राजश्री धनंजय मुंडे, जयवंत विठ्ठलराव देशमुख, राजेभाऊ फड, प्रभाकर वाघमोडे, प्रमोद बिडगर, दिलीप बिडगर, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे उमेदवार धनराज अनंतराव मुंडे यांच्यासह एकूण ४८ उमेदवारांच्या अर्जाचा समावेश आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकparli-acपरळी