शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीनंतर माता मृत्युशय्येवर होती; डॉक्टर दांपत्यास तपासण्यास वेळ नव्हता,अखेर मृत्यूने गाठले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 17:56 IST

डॉक्टर पती-पत्नीचा हलगर्जीपणा; प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव उपचाराकडे दुर्लक्षाने महिलेचा मृत्यू

- नितीन कांबळे कडा (बीड) : प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने मृत्युशय्येवर असतानाही डॉक्टर पती-पत्नीने उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने मातेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री आष्टी येथे घडली. मंदा नितीन थोरवे असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर दांपत्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार पती नितीन थोरवेने पोलीस ठाण्यात केली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  आष्टी तालुक्यातील पुंडी येथील नितीन थोरवे याची पत्नी मंदा थोरवे ( २९)  प्रसूतीसाठी पोकळे हाॅस्पीटलमध्ये गुरुवारी दुपारी दाखल झाल्या. रात्री साडेआठला त्यांना मुलगा झाला. मात्र प्रकृती ठीक नसल्याने बाळाला नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा नितीन यांनी पत्नीच्या तब्येतीची चौकशी केली. डॉक्टर त्या व्यवस्थित असल्याचे सांगितले. मात्र, दीड तासातच मंदा यांची प्रकृती ढासळली. नितीन यांनी तसे डॉक्टर पती-पत्नीला सांगितले. मात्र, ते इतर कामात व्यस्त होते. काहीवेळाने मंदा यांना नगरला अधिक उपचारासाठी घेऊन जा असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, उपचारासाठी घेऊन जात असताना मंदा यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. 

दरम्यान, डॉ. सुवर्णा पोकळे, डॉ. आदिनाथ पोकळे यांनी उपचारात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याने पत्नीचा मृत्यू झाला असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार नितीन किसन थोरवे यांनी आष्टीचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस याच्याकडे केली आहे. तसेच या तक्रारीच्या प्रति मेडिकल कौन्सिल मुंबई, पोलिस अधीक्षक बीड, उपविभागीय पोलीस कार्यालय आष्टी यांना दिल्या आहेत. शोकाकुल वातावरणात शुक्रवारी त्या महिलेचा अंत्यविधि करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू