शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी-नेत्यांची मिलीभगत, राज्यात वक्फ बोर्डच्या मालमत्तेचा सर्वाधिक गैरव्यवहार बीडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 14:03 IST

Waqf Board Land Scam: राज्यातील १६ पैकी ७ फौजदारी कारवाया बीड जिल्ह्यात

- संजय तिपालेबीड : वक्फ बोर्डच्या मालमत्तेच्या बेकायदेशीर (Waqf Board Land Scam) हस्तांतर प्रकरणामुळे सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. राज्यात वक्फच्या मालमत्ता गैरव्यवहारप्रकरणी आतापर्यंत १६ गुन्हे नोंद असून, त्यापैकी सात गुन्हे एकट्या बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अधिकारी व नेत्यांनी मिलीभगत करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता घशात घातल्याचे उघड झाले आहे.

वक्फ बोर्डच्या जमिनीच्या गैरव्यवहारासंदर्भात अनेक तक्रारी होत्या. मालमत्ता खालसा करून त्या नियमबाह्यपणे भूमाफियांच्या घशात घालण्यात आल्या. वक्फ बोर्डचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून त्याजागी खासगी लोकांची नावे सर्रासपणे लावण्यात आली. दरम्यान, वक्फ बोर्डने मालमत्ता गैरव्यवहाराविरुद्ध फौजदारी कारवाया सुरू केल्या आहेत. आष्टी पोलीस ठाणे दोन, अंभोरा, शिवाजीनगर, बीड शहर, बीड ग्रामीण, दिंद्रूड येथे प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. आष्टीतील दोन, अंभोरा ठाण्यातील एक अशा तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केलेली आहे.

आष्टीतील एका गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, उर्वरित दोन गुन्ह्यांचा तपास प्रशिक्षणार्थी आयपीएस पंकज कुमावत हे करत आहेत. दरम्यान, बीड ग्रामीण व शिवाजीनगर ठाण्यात दाखल असलेल्या दोन प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे. दरम्यान, तत्कालीन उपजिल्हाधिकारी डॉ.एन.आर.शेळके, प्रकाश आघाव यांच्यासह मंडळाधिकारी, तलाठी व काही ठिकाणी राजकीय पक्षांचे नेते आरोपी आहेत. डॉ. एन.आर. शेळकेला पोलिसांनी जेरबंद केले तर प्रकाश आघाव अजून फरार आहे.

एसआयटीचे सर्वच प्रकरणांवर लक्षवक्फ बोर्ड व देवस्थान जमिनीसंदर्भात दाखल गुन्हे व चौकशा यावर एसआयटी (विशेष तपास पथक) नियंत्रण ठेवून आहे. पोलीस महासंचालक कार्यालय, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून नियमित आढावा सुरू आहे. विशेष म्हणजे विधिमंडळ अधिवेशनातही वक्फच्या गैरव्यवहाराचा मुद्दा गाजला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही बीडमधील वक्फ घोटाळ्याच्या संदर्भात दोनवेळा बैठका घेऊन तपासाची स्थिती जाणून घेतली आहे.

देवस्थान जमीन घोटाळाही गाजणारआष्टी तालुक्यातील आठ हिंदू देवस्थानच्या ३३० एकर जमिनीच्या गैरव्यवहाराची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केलेली आहे. त्यावरून सध्या चौकशी सुरू आहे. यात देखील गुन्हे नोंद होण्याची शक्यता आहे. हा घोटाळाही गाजण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड