शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

अश्वस्वार होऊन शाळेत ठेवले पहिले पाऊल;मिरवणूक काढत वाजतगाजत मुलाचा केला शाळा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 19:21 IST

शहरातील बुद्ध विहार ते गांधी चौक, व्यापारपेठ आणि जि.प. शाळेपर्यंत मुलगा सारीपूत्त याची बँड लावून घोड्यावरून मिरवणूक काढली.

शिरूर कासार (बीड) : तालुक्यातील उखळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दादा सोनवणे यांनी आपल्या मुलाचा शहरातील जि.प. शाळेत वाजतगाजत घोड्यावरून मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्येदेखील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असून पालकांचा ओढा या शाळांकडे असावा अशा उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला. 

शहरातील बुद्ध विहार ते गांधी चौक, व्यापारपेठ आणि जि.प. शाळेपर्यंत सोनवणे यांनी आपला मुलगा सारीपूत्त याची बँड लावून घोड्यावरून मिरवणूक काढली. मिरवणूक मार्गावरील सर्व लोक मोठ्या कुतूहलाने हे आगळंवेगळं चित्र पाहत होते. एरवी आपण नवरदेवाचा परण्या किंवा एखाद्या संत-महंताची घोड्यावरून मिरवणूक पाहत असतो. परंतु एका शिक्षकाने मात्र मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलाचा उत्साहात आणि थाटात प्रवेश व्हायला हवा हा विचार करून सर्व खर्च केला. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक अंकुश शिंदे यांनी सारीपूत्तचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या वेळी शाळेचे सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जि.प. शाळेत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणमाझे शिक्षणदेखील याच शाळेत झाले असून आज मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या तुलनेत मराठी शाळेत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. पालकांनी जि.प. शाळेविषयी मनात कसलाही न्यूनगंड न बाळगता शाळेत प्रवेश द्यायला हवा, असे शिक्षक तथा पालक दादा सोनवणे म्हणाले.

टॅग्स :SchoolशाळाBeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्र