शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

सकाळी दुध डेअरीवर गेलेला शेतकरी परतलाच नाही; दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 17:42 IST

काही दिवसांपूर्वी वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप मुलाने केला आहे

- नितीन कांबळेकडा (बीड) - डेअरीवर दुध घालण्यासाठी गेलेला शेतकरी घरी परतला नसल्याची घटना मंगळवारी घडली होती. आज दुपारी या शेतकर्‍याचा बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील दत्त मंदिराच्या बाजूला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रोहीदास नारायण खोटे (५०) वर्ष असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील कडा येथील शेतकरी रोहीदास नारायण खोटे हे मंगळवारी सकाळी घरातून डेअरीवर दुध घालण्यासाठी गेले होते. परंतु ते घरी परतले नव्हते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाही. मात्र, आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान एक गॅरेज दुकानदार लघुशंकेसाठी गेला असता तेथे एक मृतदेह आढळून आला. त्याने याची माहिती कडा पोलिस चौकीला दिली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह खोटे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. तेथे एका विषारी द्रव्याची बॉटल सुद्धा आढळून आली. शेतकरी खोटे यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना करण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होतीदरम्यान, सोमवारी मध्यरात्री आळंदी येथील एकव्यक्ती तीनचार जणांना घेऊन आई-वडिल राहत असलेल्या  कडा डोंगरगण रोडवरील घरी आले होते. यावेळी त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून वडील रोहिदास खोटे यांना अपमानित करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वडिल मंगळवारपासून गायब होते.  यातूनच त्यांचे बरेवाईट झाल्याचा आरोप मृताचा मुलगा नागेश खोटे यांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड