शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

घात झाला की जीवन संपवले; परळीत व्यावसायिकाचा रेल्वेरुळाजवळ आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 11:51 IST

पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.

परळी: येथील मथुरा मल्टी सर्व्हिसेसचे चालक सचिन पोखरकर (४०) यांचा गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास परळी - गंगाखेड मार्गावरील रेल्वेरुळाजवळ सिमेंट फॅक्टरी परिसरात मृतदेह आढळून आला. या परिसरात त्यांची दुचाकीही पोलिसांना दिसून आली आहे. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, सचिन पोखरकर यांनी आत्महत्या केली की घात झाला या विषयी चर्चा सुरू आहे.

गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास परळी ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश तोटेवाड, जमादार पवार व वाहन चालक मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन पोखरकर यांचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात रात्री आणण्यात आला. शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळ सचिन पोखरकर यांचे मथुरा मल्टी सर्विसेस नावाने दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी,आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. लोकमत सखीमंच परळीच्या प्रमुख सुचिता पोखरकर यांचे ते पती होत. दरम्यान, ही आत्महत्या असावी असा अंदाज परळी ग्रामीण पोलीसानी व्यक्त केला आहे. वैद्यनाथ मंदिराजवळील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीत आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड