शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणारा दुचाकी चोरीकडे वळाला, तिसऱ्याच दिवशी पोलिसांना मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 19:43 IST

शेख आशपाक शेख आसेफ हा सराईत गुन्हेगार असून घरफोड्या करण्यात तो एक्सपर्ट आहे. त्याच्यावर ९० पेक्षा अधिक घरफाेड्यांचे गुन्हे नोंद

बीड: घरफोड्या करण्यात हातखंडा असलेल्या गुन्हेगाराने नशेत गुन्हेगार मित्राच्या संगतीने दुचाकी चोरी केली. मात्र, चोरलेल्या दुचाकीसह तिसऱ्याच दिवशी त्यास पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला १९ एप्रिल रोजी यश आले. शेख आशपाक शेख आसेफ (४०, माेहमदिया कॉलनी, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. 

शहरातील स्वराज्यनगरातून १६ एप्रिल रोजी योगेश भारत नाईक (२५) यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच २३ एव्ही- २८९६) घरासमोरून लंपास झाली होती. याप्रकरणी १९ रोजी नाईक यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, शेख आशपाक शेख आसेफ हा चोरीच्या दुचाकीसह बार्शी रोडवरील एका लॉन्ससमोर उभा असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, हवालदार मनोज वाघ, रामदास तांदळे, पो.ना. प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड यांचे पथक रवाना केले. यावेळी सापळा रचून शेख आशपाक यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने अक्षय ऊर्फ चिंट्या मिठू गायकवाड (रा. पात्रूड गल्ली, बीड) याच्यासमवेत दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दुचाकीसह शेख आशपाक यास शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. २० रोजी शिवाजीनगर पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहात झाली. दरम्यान, अक्षय ऊर्फ चिंट्या गायकवाड हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी सांगितले.

परभणी पोलिसांनी घेतला ताबादरम्यान, शेख आशपाक याने परभणी जिल्ह्यात मोठी घरफोडी केली होती. तपासात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यामुळे परभणी पोलिसांनी त्याचा ताबा मागितला. न्यायालयाच्या परवानगीने त्यास परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून तेथील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

घरफोड्यांचे ९० गुन्हेशेख आशपाक शेख आसेफ हा सराईत गुन्हेगार असून घरफोड्या करण्यात तो एक्सपर्ट आहे. त्याच्यावर ९० पेक्षा अधिक घरफाेड्यांचे गुन्हे नोंद असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली. अक्षय ऊर्फ चिंट्या गायकवाड व तो चांगले मित्र असून त्यांना नशा करण्याची सवय आहे. नशेत असतानाच स्वराज्यनगरात पायी फिरताना मध्यरात्री त्यांनी दुचाकी लंपास केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड