शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मामाने रुग्णालयात बोलवल्याची थाप; हॉस्टेलसमोरून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 17:11 IST

निर्जनस्थळी अत्याचार केल्यानंतर पीडितेला मुळगावी नेऊन सोडले

केज ( बीड) : 'तू आजारी असल्यामुळे उपचारासाठी तुझ्या मामाने तुला रूग्णालयात बोलावले आहे', अशी थाप मारुन दोघांनी शहरात शिक्षणानिमित्त राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलीचे तिच्या हॉस्टेलसमोरून अपहरण केले. त्यानंतर अंबाजोगाई महामार्गावर असलेल्या एका लाॅजच्या मागील जागेत नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध केज पोलिसांत गुरुवारी रात्री गुन्हा नोंद झाला आहे.

बीड तालुक्यातील एका गावच्या अल्पवयीन मुलीस शिक्षणानिमित्त मामाने केज शहरातील हॉस्टेलवर ठेवले. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव ( दोघेही राहणार दहीफळ चिंचोली) हे दोघे मुलीच्या हॉस्टेलवर आले. 'तू आजारी असल्यामुळे तुझ्या मामाने तुला शहरातील उपजिल्हा रूग्णालयात बोलावले आहे', अशी थाप मारुन दोघांनी तिला दुचाकीवर बसवून अंबाजोगाई महामार्गावर नेले. येथे एका लाॅजच्या मागील खुल्या जागेत सनी उर्फ स्वप्नील पाडळे याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला मुळगावी सोडले. अत्याचारामुळे घाबरलेल्या पिडीतीने आईवडिलांना आपबीती सांगितली. नातेवाइकांनी लागलीच केज पोलिस स्टेशन गाठले. 

या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून केज पोलिस स्थानकात बाल लैंगीक प्रतिबंधक, पोक्सो कायद्यानुसार सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड