शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'तेरे लष्कर के मुकाबले अकेला हूं मै...', धनंजय मुंडेंचे विरोधकांना खास शायरीतून आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 11:48 IST

नाथ प्रतिष्ठाणच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे शानदार उद्घाटन

परळी ( बीड ) : मागील दोन वर्षात दोन वेळा कोरोना झाला, जवळची अनेक माणसे गमावली यासोबत अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सत्ता असो किंवा नसो आपण अशा संकटांना तोंड देण्यासाठी समर्थ आहोत, तसेच परळीच्या जनतेच्या सेवेत कोणत्याही संकटात असलो तरी कमी पडणार नाही,अशी ग्वाही माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 

एवढेच नाही तर मुंडेंनी संकटांना आव्हान देत राहत इंदौरी यांची शायरी देखील आपल्या खास शैलीतून सादर केली, ते म्हणाले "राह मे खतरे बहुत है, लेकीन ठहरता कौन है?मौत कल आती है, आज आ जाये, डरता कौन है?तेरे लष्कर के मुकाबले अकेला हूं मैमगर फैसला मैदान मे होगा की, मरता कौन है!"     

धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाणच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते  बुधवारी सायंकाळी शानदार सोहळ्यात उद्घाटन झाले. नाथ प्रतिष्ठाणच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत त्यांच्या अडचणी सोडवायला व मदतीला आम्ही सदैव तत्पर असतो. दुष्काळात घरोघर पाणी पोहोच देणारे, कोरोनाच्या काळात सर्व जागी सर्व बाबींसाठी मदतकार्य करणारे नाथ प्रतिष्ठाण होते. या सेवा व्रतासोबतच वैद्यनाथ गणेशोत्सव व विविध सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून जनसेववची व सांस्कृतिक सेवेची परंपरा मागील 17 वर्षांपासून सुरू आहे, पुढेही ही परंपरा अखंड सुरू ठेऊ असेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. या उदघाटन कार्यक्रमास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील उपस्थित होत्या, मागील 17 वर्षांपासून मी नाथ प्रतिष्ठाण आयोजित प्रत्येक कार्यक्रमास येत असून, धनु भाऊ हे पुढेही जेव्हा बोलावतील तेव्हा मी परळीत येईल, असेही त्या म्हणाल्या. 

यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री स्पृहा जोशी, हेमांगी कवी, तेजा देवकर, प्राजक्ता गायकवाड, पूनम कुडाळकर यांचीही उपस्थिती होती. यासह आ. संजय भाऊ दौंड, राजकिशोर मोदी, अजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, विष्णुपंत सोळंके, सौ. संगीताताई तुपसागर, लक्ष्मणतात्या पौळ, बालाजी (पिंटू) मुंडे, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, दीपकनाना देशमुख, प्रा. विनोद जगतकर, शकील कुरेशी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आदी उपस्थित होते. सूत्र संचालन अनंत इंगळे आभार सचिव नितीन कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

उद्घाटन समारंभानंतर सर्व सिनेकलाकारांच्या समूहाने गणेशवंदना सादर केली व त्यानंतर लावण्यवतींचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. उपस्थित सर्वच सिनेतारकांनी एकापेक्षा एक कलांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीड