शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
'महाभारत'मधील कर्णाचा अस्त, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
4
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
5
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
6
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
7
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
8
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
9
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
10
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
11
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
12
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
13
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
14
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
15
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
16
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
17
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
18
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
19
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
20
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा

सेवत कायम करण्याच्या मागणीसाठी अस्थायी डॉक्टर संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 18:02 IST

अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात ४५ डॉक्टर आजही अस्थायी स्वरुपात कार्यरत असून सेवा देत आहेत.

ठळक मुद्देएकदम ४५ डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेवर मोठा ताण आला आहे. डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात रॅली काढली व अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने केली.

अंबाजोगाई - अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालाय येथील अस्थायी ४५ डॉक्टर सोमवारी संपावर गेले आहेत. या डॉक्टरांनी आपल्याला सेवेत कायम करावे या मागणीसाठी रुग्णालयातील रॅली काढली व अधिष्ठाता कार्यालयासमोर हे सर्व डॉक्टर धरणे आंदोलन  करत आहेत. आज एकदम ४५ डॉक्टर संपावर गेल्याने स्वा. रा. ती. च्या रुग्णसेवेवर मोठा ताण आला आहे. 

अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात ४५ डॉक्टर आजही अस्थायी स्वरुपात कार्यरत असून सेवा देत आहेत. यातील बहुसंख्य डॉक्टर हे वैद्यकीय महाविद्यालयात अस्थायी स्वरपात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वच डॉक्टरांनी कोरोनाच्या रुग्णांना उपचार देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. सेवेत कायम स्वरूपी सामावून घ्यावी, या मागणीसाठी त्यांचा सातत्यान ेलढा सुरू आहे. १५ व १६ आॅक्टोबर रोजी या अस्थायी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले होते. अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शनेही केली होती. या सर्व डॉक्टरांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे यासाठी लढा सुरूच आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत असल्याने सोमवार, २ नोव्हेंबरपासून हे सर्व डॉक्टर संपावर गेले आहेत. डॉक्टर संपावर गेल्यामुळे स्वा. रा.ती.मधील रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. 

शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात रॅली काढली व अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने केली. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना दिले आहे. जोपर्यंत शासन आपल्या मागण्या मान्य करणार नाहीत तोपर्यंत अस्थायी डॉक्टर  संपावरच राहतील. असा इशारा अस्थायी डॉक्टर संघटनेचे प्रमुख डॉ. अमित लोमटे यांनी दिला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनdoctorडॉक्टरBeedबीड