शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत भरवस्तीत टेंपो जळून खाक; चालकाने प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 17:20 IST

आनंद नगर भागात घरासमोर लावलेल्या टेंपोला अचानक लागलेल्या आगीत टेंपो जळून खाक झाला. हि दुर्घटना सोमवारी दुपारी २.१५ वाजता घडली.

ठळक मुद्देदुपारच्या वेळेस टेंपोमध्ये काही लहान मुले खेळत होती.त्यावेळेस अचानकच टेंपोच्या छताला आग लागली.

अंबाजोगाई (बीड ) : येथील आनंद नगर भागात घरासमोर लावलेल्या टेंपोला अचानक लागलेल्या आगीत टेंपो जळून खाक झाला. हि दुर्घटना सोमवारी दुपारी २.१५ वाजता घडली. टेंपो चालकाने प्रसंगावधान राखत पेटलेला टेंपो मोकळ्या जागेत आणून उभा केल्याने संभाव्य अनर्थ टळला.

सदरील टेंपो (एमएच ४४ - ७३७९) परळी येथील समदभाई यांच्या मालकीचा असून अंबाजोगाई येथील शेख शकील हे टेंपोवर चालक आहेत. शकील यांनी सोमवारी बाहेरगावाहून आल्यानंतर टेंपो स्वतःच्या घरासमोर लावला. दुपारच्या वेळेस टेंपोमध्ये काही लहान मुले खेळत होती. त्यावेळेस अचानकच टेंपोच्या छताला आग लागली. मुलांनी आरडाओरडा करून शकील यांना बाहेर बोलावून घेतले. घर अरुंद गल्लीत असल्याने शकील यांनी प्रसंगावधान राखत मुलांना टेंपोतून बाहेर काढले आणि पेटलेला टेंपो ग्रामीण विकास मंडळासमोरील मोकळ्या जागेत आणून उभा केला. तोपर्यंत आगीने संपूर्ण टेंपोला कवेत घेतले. अग्निशमन दलाची गाडी येऊन आग आटोक्यात येईपर्यंत टेंपोचे अतोनात नुकसान झाले होते.

शेख शकील यांना अश्रू अनावर दरम्यान, स्वतःची उपजीविका असणारे वाहन डोळ्यासमोर जाळून खाक होताना पाहून टेंपो मालक शेख शकील आणि त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. तशाही परिस्थितीत पेटत्या टेंपोतून लहान मुलांना बाहेर काढत पेटता टेंपो दाट वस्तीच्या भागातून मोकळ्या मैदानात चालवत नेण्याचे प्रसंगावधान शकील यांनी दाखविले. जर अरुंद गल्लीत आग भडकली असती तर फार मोठा अनर्थ ओढवला असता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अद्याप याप्रकरणी पोलिसात नोंद झालेली नाही.

टॅग्स :fireआगAmbajogaiअंबाजोगाईfour wheelerफोर व्हीलरAccidentअपघात