शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
2
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
5
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
6
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
7
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
8
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
9
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
10
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
11
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
12
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
13
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
14
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
15
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
16
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
17
Laxmi Pujan 2025: स्थिर लक्ष्मी हवी? लक्ष्मीपूजन करताना झाडू आणि खडे मीठाने करा 'हा' खास उपाय!
18
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
19
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
20
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम

नवरात्र महोत्सवासाठी मंदिरे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:20 IST

प्रामुख्याने नवरात्र महोत्सवाची लगबग सुरू असून शक्तिपीठावरची आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : तालुक्यात प्रामुख्याने नवरात्र महोत्सवाची लगबग सुरू असून शक्तिपीठावरची आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील कालिका देवी संस्थानवर सालाबाद प्रमाणे यंदाही महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद्भागवत कथेबरोबर श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा होणार असून, नित्य षोडशोपचार पूजा, घटस्थापना, महाआरती, धरणे प्रवचनादी धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.रायमोहा येथे दगडवाडीजवळ प्रतीमोहटा म्हणून नावारूपाला आलेल्या डोंगर देवी संस्थांनवर नामवंत कीर्तनकारांना निमंत्रित करून कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. शिवाय शहरापासून अगदी दहा-बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदुवासिनी संस्थानवर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.कालिका देवी संस्थान हे सिंदफणा नदीकाठी आहे. विश्वस्तांनी मोठ्या परिश्रमाने तेथील हेमाडपंथी मंदिराचे त्याचे मोठ्या स्वरूपात विस्तारीकरण केले आहे. या देवीचा मोठा भक्त परिवार असून, एक जाज्वल्य स्थान मानले जाते. नवसपूर्ती म्हणून महिला भाविक मोठ्या संख्येने धरणे धरून उपवास करीत असतात. येणाऱ्या भाविकांसह मंदिरात धरणेकरूंची सर्वतोपरी व्यवस्था व्हावी, ही गोष्ट केंद्रस्थानी मानून विश्वस्थ मंडळी गेली पंधरा दिवसांपासून परिश्रम घेत आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई, मंडपासह, स्वच्छता, निवास व्यवस्था, चहा पाणी, फराळाची व्यवस्था भक्तांच्या सहभागातून केली जात असते. हे सर्व करताना नवरात्रात नवविध भक्ति घडावी याकडेही प्रकर्षाने लक्ष दिले जाते.भागवताचार्या अंजलीताई दिघे (आळंदी) यांच्या वाणीतून भागवत कथा आयोजीत करण्यात आली आहे. संगीत कथेबरोबर सकाळी काकडा भजन, विष्णुसहस्र नाम, कालिका पुराण, होम हवन, अनुष्ठानासह ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण व प्रवचन होणार आहेत. व्यासपीठ चालकाची धुरा विजयकुमार गाडेकर पाटील व भगवान गुरुजी सांभाळणार आहेत. किमान शंभर वाचक सहभागी होतील असा प्रयास आहे.प्रवचन सेवा ही बिदागी विरहित असते. त्यासाठी भीमाबाई डोंगरे, शालिनीताई देशपांडे (पुणे), गोविंद पाटील, चंद्रकांत थोरात, विनायक महाराज अष्टेकर (औरंगाबाद), विजयकुमार गाडेकर हे आपली सेवा समर्पित करणार आहे. या संपूर्ण नवरात्र महोत्सवाचा समारोप धाकट्या अलंकापुरीचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.डोंगरदेवी संस्थानवर महाराष्ट्रातील कीर्तनकारांना निमंत्रित केले आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कालिकादेवी विश्वस्त अध्यक्ष रोहीदास पाटील, सचिव बापूराव गाडेकर व सदस्यांनी केले आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम