शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सुनावणीसाठी बीड जिल्हा परिषदेत शिक्षकांची जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:34 IST

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी प्रशासनाकडे दाखल तक्रारीनुसार ४१५ शिक्षकांच्या सुनावणीला गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. या सुनावणीमुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरुप आले होेते.

ठळक मुद्देतालुकानिहाय शिक्षकांची झाली सुनावणी

बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी प्रशासनाकडे दाखल तक्रारीनुसार ४१५ शिक्षकांच्या सुनावणीला गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. या सुनावणीमुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरुप आले होेते. तर ज्यांनी चुकीची माहिती दिली होती, असे बहुतांश शिक्षक या सुनावणीला गैरहजर असल्याचे दिसून आले.

बीड जिल्हा परिषदेतील ३४७१ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या होत्या. या बदल्यांसाठी आॅनलाईन अर्ज भरताना चुकीची तसेच खोटी माहिती देत अनेक शिक्षकांनी बदलीचा फायदा घेतला. तर अनेक शिक्षकांना विस्थापित व्हावे लागले.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत संवर्ग १ व २ मधील शिक्षकांनी खो दिलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. त्यामुळे पसंतीक्रम बाद झाल्याची तक्रार आली होती. बदली प्रक्रिया सेवा ज्येष्ठतेनुसार होणे अपेक्षित असताना सेवेने कनिष्ठ शिक्षकांना वरिष्ठ शिक्षकांनी मागितलेल्या जागा देण्यात आल्या. पती- पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेण्यासाठी संवर्ग ४ मधून बदली अर्ज भरलेल्या पती- पत्नीचा या बदली प्रक्रियेत विचार झाला नाही. त्यामुळे अनेक पती- पत्नी एकटेच विस्थापित झाले. विशेष म्हणजे यात महिला शिक्षिका जास्त प्रमाणात विस्थापित झाल्या.

संवर्ग ४ मधील व संवर्ग २ मधील कर्मचाऱ्यांना वेगवेगळा न्याय बदली प्रक्रियेत मिळाल्याच्या तक्रारी होत्या. सुरुवातील सामान्य वाटणारे हे प्रकरण नंतर मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतले. या तक्रारी निकाली काढण्याच्या अनुषंगाने ४१५ शिक्षकांची सुनावणी सुरु करण्यात आली.सुनावणीसाठी दोघांना संधीआलेल्या तक्रारींचा निपटारा व्हावा, त्या निकाली निघाव्यात म्हणून ही सुनावणी होत आहे. सुनावणीसाठी दोघांना संधी दिलेली आहे. कागदपत्रांची तपासणी होणार आहे. तसेच १८ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या आहेत. त्यांचे खुलासे आल्यानंतर कारवाई होईल.- अमोल येडगेमुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :BeedबीडTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळाMarathwadaमराठवाडा