बीड : धार्मिक कार्यक्रम करून एका तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला आमिष दाखवून पळवून नेले. तेलंगणा राज्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी तरूणाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.नरसिंग गोविंद बिरादार (२०, रा. औराज शहाजनी ता. निलंगा जि. लातूर) असे आरोपीचे नाव आहे.बीड शहरातून ५ फेब्रुवारी रोजी दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. नातेवाईकांनी ६ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर ठाण्यात अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.डी. औसरमल यांनी तपास सुरु केला. तेव्हा अपहृत मुलगी तेलंगणात असल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी पोलीस नाईक ए.डी. नाईक, महिला कर्मचारी पौर्णिमा अभंग यांनी तेलंगणात जाऊन दोघांनाही ताब्यात घेतले. शनिवारी रात्री बीडमध्ये आल्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. तिला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात बाललंैगिक अत्याचार व बलात्काराचे कलम वाढविण्यात आले. आरोपी नरसिंग बिरादार यास रविवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे अधिक तपास करत आहेत.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेत तरूणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:16 IST
धार्मिक कार्यक्रम करून एका तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला आमिष दाखवून पळवून नेले.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेत तरूणीवर अत्याचार
ठळक मुद्देबीडमधील प्रकार : तरूणाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा