शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नीलचे रुग्णसेवेचे स्वप्न अधुरे; नाशिकमध्ये संशयास्पद मृत्यूने कुटुंबाला जबर धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 14:04 IST

दोन महिन्यांपूर्वी बीडला घरी आल्यानंतर डॉ. स्वप्नील शिंदेने रॅगिंगबाबत आई-वडिलांना सांगितले होते.

ठळक मुद्देडॉ. स्वप्नील संवेदनशील, गुणी स्वभावामुळे परिचितरॅगिंगच्या तक्रारीनंतर महिनाभरापासून आई राहायची सोबत

बीड : स्वप्नील अभ्यासात लहानपणापासूनच गुणी होता...वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे त्याचे स्वप्न होते. यातून त्याला रुग्णांची सेवा करायची होती, पण आता त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. मात्र, दुर्दैवाने हे वास्तव असून, ते मान्य करावे लागणार आहे. महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे एकुलत्या एका मुलाला गमवावे लागले, अशा शब्दांत डॉ. स्वप्नील शिंदे याचे वडील महारुद्र शिंदे यांनी भावनांना वाट मोकळी केली. ( Swapnil's dream of patient care is unfulfilled; Suspicious death in Nashik shocks family) 

नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये एमडीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा डॉ. स्वप्नील शिंदे (२६, रा. श्रीरामनगर, बीड) याचा १७ ऑगस्टला संशयास्पद मृत्यू झाला. या महाविद्यालयातील चार सिनिअर विद्यार्थिनी त्याची रॅगिंग करीत. त्यातून त्याचा घातपात झाल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी १८ ऑगस्टला केला. डॉ. स्वप्नीलचे वडील महारुद्र शिंदे हे कंत्राटदार आहेत. मूळचे गेवराई तालुक्यातील देवपिंप्री येथील शिंदे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये राहते. स्वप्नील त्यांचा एकुलता एक मुलगा. सेंट ॲन्स स्कूलमध्ये त्याने प्राध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण घेतले. एमडीच्या द्वितीय वर्षात तो शिकत होता. वर्षभरानंतर स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून तो महाविद्यालयातून बाहेर पडला असता. मात्र, दुर्दैवाने तो रॅगिंगचा बळी ठरला. चार सिनिअर विद्यार्थिनींकडून त्याचा छळ सुरू होता. दरम्यान, १७ ऑगस्टला सायंकाळी तो महाविद्यालयात गेला. आंतररुग्ण विभागातील एका रुग्णाची भेट घेतल्यानंतर स्वच्छतागृहात तो काेसळला. त्यानंतर त्याच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली.

दोन महिन्यांपूर्वी आला होता घरीडॉ. स्वप्नील शिंदे हा दोन महिन्यांपूर्वी बीडला घरी आला होता. त्याने रॅगिंगबाबत आई-वडिलांना सांगितले होते. त्यानंतर आई-वडिलांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांना भेटून कळविले होते. १७ जूनला तो नाशिकला परत गेला. मात्र, त्याचा रॅगिंगच्या तक्रारीने आई सत्यशीला या नाशिकला त्याच्याकडे राहत. तो आत्महत्या करू शकत नाही, त्याचा घातपातच झाल्याचा दावा वडील महारुद्र शिंदे यांनी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी केली.

असह्य अपमान... मानसिक त्रासमहारुद्र शिंदे म्हणाले, स्वप्नीलची रॅगिंग करणाऱ्या मुली त्याला सतत अपमानित करीत. त्यामुळे तो नैराश्येत जाऊ नये म्हणून मी प्रोत्साहन देत असे. १७ रोजी सकाळी त्यास एक मोटिव्हेनशल व्हिडिओ पाठविला होता. शिवाय फोन करून विचारपूसही केली होती. मात्र, हा फोन शेवटचा असेल असे कधी वाटले नाही, असे सांगताना महारुद्र शिंदे यांना हुंदका आवरता आला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडdoctorडॉक्टर