शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

चारित्र्यावर संशय; गर्भवती पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:49 IST

चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा दारूड्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून खून केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा दारूड्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून खून केला. ही खळबळजनक घटना केज तालुक्यातील बनसारोळा येथे रविवारी रात्री घडली. विशेष म्हणजे या दारूड्या पतीने पत्नीच्या बाळंतपणाचे कारण सांगून १०८ रूग्णवाहिकासुध्दा बोलावली. रूग्णवाहिकेतील डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर हा प्रकार समोर आला. पत्नी मयत झाल्याचे समजताच दारूड्या पतीने घटनास्थळावरून पळ काढला.काजल ज्ञानेश्वर गोरेमाळी (वय २५, रा. बनसारोळा) असे मयत महिलेचे नाव आहे. कळंब तालुक्यातील खामसवाडी मोहा येथील काजलचा विवाह तीन वर्षापुर्वी बनसारोळा येथील ज्ञानेश्वर गोरे याच्यासोबत झाला होता. काजल आणि ज्ञानेश्वरला दोन वर्षाची एक मुलगी आहे.आता ती दुसऱ्यांदा गर्भवती होती. विवाहानंतर काही दिवस सुखाचे गेले. परंतु नंतर काही दिवसांनी ज्ञानेश्वरला दारूचे व्यसन जडले. नेहमी दारू पिऊन तो काजलला मारहाण करीत असे. रविवारीही तो दारू पिऊन आला. त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास नळास पाणी आले. काजल पाणी भरत होती. एवढ्यात ज्ञानेश्वरने किरकोळ कारण काढत तिला मारहाण करण्यास सुरूवात केली.रागाच्या भरात त्याने बाजुलाच पडलेल्या खो-याचा दांडा घेऊन काजलच्या डोक्यात घातला. काजल बेशुद्ध होऊन जागीच ठार झाली.दरम्यान, खुन केल्यानंतर ज्ञानेश्वरने १०८ क्रमांकावर फोन करून काजलला बाळंतपणासाठी घेऊन जायचे आहे, असे सांगून रु ग्णवाहिका बोलावून घेतली. रु ग्णवाहिका आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता काजल मयत असल्याचे दिसले.डॉक्टरांनी तात्काळ ही माहिती युसूफवडगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी बनसारोळा येथे धाव घेत पंचनामा करून काजलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बनसारोळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला.पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर विरोधात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अंधारे यांनी घटनास्थळावरून दांडा व इतर साहित्य जप्त केलेआहे.अंबाजोगाईपर्यंत पायी प्रवासकाजलचा खून केल्यानंतर ज्ञानेश्वरने काढता पाय घेतला. वाहनाने गेल्यावर पोलीस पकडतील म्हणून तो वळण रस्त्यांनी पायी चालत अंबाजोगाईला गेला. येथे चुलत भावाकडे थांबला.त्याला सर्व कहानी सांगितल्याने चुलतभावाने त्याला अंबाजोगाई शहर पोलिसांकडे घेऊन गेला. तेथून युसूफवडगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.विशेष म्हणजे रात्री तो एका ठिकाणी पाईपलाईनच्या खड्ड्यात झोपला आणि सकाळी उठून अंबाजोगाई गाठली.श्रावणी झाली पोरकीकाजल व ज्ञानेश्वर यांना श्रावणी ही दोन वर्षाची मुलगी आहे. आईचा खून आणि वडिल कारागृहात जाणार असल्याने ती मायेला पोरकी झाली आहे. काजलला आई-वडील नसून ज्ञानेश्वरचे आई-वडीलही वृद्ध आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी