शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरी चालकाला धमकी देऊन पैसे मागणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:00 IST

शहरातील एका लॉटरी चालकाला धमकी देऊन पैसे मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. गुन्ह्यातील प्रकरणात जामिनावर बाहेर असताना मारहाण करून व धमकी देऊन पैसे मागितल्याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

ठळक मुद्देएडीएसची कारवाई : विविध ठिकाणी १० गंभीर गुन्ह्यांची हिस्ट्री

बीड : शहरातील एका लॉटरी चालकाला धमकी देऊन पैसे मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. गुन्ह्यातील प्रकरणात जामिनावर बाहेर असताना मारहाण करून व धमकी देऊन पैसे मागितल्याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कारवाई करत दरोडाप्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.करण प्रताप गायकवाड (रा.बारादरी यादवाचा मळा गल्ली बीड) असे त्या सराईत आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात दोन खून, जबरी चोरी, मारामारी असे १० गुन्हे दाखल आहेत. तो मागील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आहे. शनिवारी ५.३० वाजता करण हा शहरातील भाजीमंडई परिसरातील एका लॉटरीच्या दुकानात गेला होता. तो लॉटरी चालकाच्या ओळखीचा होता. त्याठिकाणी तो लॉटली खेळला त्याच्याकडे लॉटरी खेळण्यासाठी देखील पैसे नव्हते.दुकानदाराला धमकी देत त्याने तो लॉटरी खेळला. त्यानंतर त्याने ‘मी पैसे जिंकलो असून, मला ४५०० रुपये दे’ असे म्हणत लॉटरी चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी करण गायकवाड याने दुकानातील डेस्कटॉप उचलून फिर्यादीच्या अंगावर फेकला. तसेच त्याला मारण्याचा धाक दाखवला, दरम्यान करण याने लॉटरी चालकाच्या गल्ल्यातील ४५०० रुपये घेऊन करण त्याठिकाणावरून निघून गेला. यादरम्यान लॉटरी चालकाचा मोबाईल भिंतीवर फेकून दिला यामुळे मोबाईलचे नुकसान झाले.त्यानंतर लॉटरी चालकाकाने करण प्रताप गायकवाड याच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. दरम्यान करण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून १० गुन्हे दाखल असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोनि वासूदेव मोरे यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यासाठी तीन टिम तयार करण्यात आल्या होत्या. तिन्ही टीमने तपासाची चक्रे फिरवत सराईत गुन्हेगार करण गायकवाड याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास ठाणे प्रमुख मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कांगुने हे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडArrestअटकCrime Newsगुन्हेगारी