जिल्हाध्यक्षपदी रमेश टाकणखार
पाटोदा : येथील वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील प्रा. रमेश टाकणखार यांची राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्षदी नुकतीच नियुक्ती केली. ९ फेब्रुवारीला परिषदेच्या औरंगाबाद विभागीय कार्यकारिणीच्या पार पडलेल्या ऑनलाईन सभेत राज्याचे अध्यक्ष प्रा. सुमित पवार यांनी प्रा. टाकणखार यांच्या नावांची घोषणा केली.
निवडीबद्दल प्रदीप नेहरकर यांचा सत्कार
धारूर : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप नेहरकर यांची नुकतीच धारूर तालुका संजय गांधी निराधार समितीवर निवड झाली आहे. निवड झाल्याबद्दल प्रदीप नेहरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. राम लोखंडे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सादिक इनामदार, गणेश थोरात, आदींची उपस्थिती होती. निवडीबद्दल त्यांचे स्वागत होत आहे.
मोकाट गुरांमुळे वाहतुकीला अडथळा
बीड : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावरच ही मोकाट गुरे ठाण मांडून बसत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नगरपालिकेच्या वतीने मोकाट गुरांना बंदिस्त करून मालकांना दंड ठोठावण्यासाठी कोंडवाडे तयार आहेत; मात्र हे कोंडवाडे वापराविना पडून आहेत. प्रमुख चौकांमध्येच ही गुरे बसत असल्याने वाहनकोंडी होत आहे.