शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपूरक व्यवसायाची धरली साथ; शेळीपालनातून शेतकऱ्याने मिळवले साडेबारा लाखांचे उत्पन्न  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 19:42 IST

दिंद्रूडच्या शेतकऱ्याने शेतीपूरक व्यवसायातून प्रेरणा

ठळक मुद्देप्रकल्पात सध्या २१० शेळ्या

- संतोष स्वामी

दिंद्रूड : परंपरागत शेतीला फाटा देत अवघ्या एक एकर शेतीत शेळीपालनाचा प्रकल्प उभारत माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड लगतच्या पिंपळगाव येथील शेतकऱ्याने दोन वर्षांत तब्बल साडेबारा लाखांची मिळकत मिळवली आहे. शेतीपूरक व्यवसायिकांसमोर प्रेरक पाऊल ठेवले आहे.   

सुभाष मायकर या शेतकऱ्याकडे पिंपळगाव शिवारात २० एकर शेती आहे. दिंद्रुड-बेलोरा रस्त्यावर असलेल्या एक एकर शेतीत केवळ २० गुठ्यांत शेळीपालनाचा शेड उभारला आहे तर उर्वरित २२ गुंठ्यात मारवेल गवत व मेथी घास शेळींना चारा पेरा केला आहे. मायकर यांनी दोन वर्षांपूर्वी ३५ शेळ्या व आफ्रिकन बोर जातीचे एक बोकड व एक राजस्थानी कोठा जातीचे एक असे दोन बोकड विकत घेतले. या सुरु  केलेल्या प्रकल्पात सद्यस्थितीत त्यांच्या प्रकल्पावर २१० शेळी व बोकड त्यांनी कमावली आहेत. बंदिस्त शेडमध्ये शेळीपालन होत असल्याने शेळ्यांना कुठलाही प्रकारचा आजार होत नसल्याचे मायकर यांनी सांगितले. शेळी पालनासाठी माझा परिवार त्यांच्या प्रकल्पात काम करत आहे. मायकर यांच्या शेळीपालन प्रकल्पास शेळीपालन उत्सुकतेने भेटी देतात. 

अशी केली जाते निगराणी शेळ्यांच्या वयानुसार वर्गीकरण करण्यात आले असून बंदिस्त शेडमध्ये ९ विविध टप्प्यानुसार शेळ्यांचे विभाग पाडले आहेत. यात शेळ्यांना सकाळी ७ वाजता २०० ग्रॅम मकाचा खुराक, सकाळी ९ वाजता सोयाबीनचा भुसा, १२ वाजता मेथी घास, दुपारी ३ वाजता मारवेल गवत दिले जाते. सायंकाळी ५ वाजता पिलांना शेळीचे दूध व वयातील शेळी-बोकडांना ज्वारीचा कडबा असा नित्यक्र म चालतो. वर्षात दोनदा इिटवी व पीपीआरची लस या शेळ्यांना देत आरोग्याची काळजी घेतली जाते. 

या व्यवसायात भरघोस नफा आहेशेतीतील उत्पादन केलेल्या कडधान्याच्या टाकाऊ वस्तुपासून शेळ्यांना खाद्य म्हणून वापर करता येतो. पर्यायाने कमी खर्चात शेळी पालन होत असून भरघोस नफा या व्यवसायात आहे. शेतीत पुरेसे पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी या व्यवसायात उतरत नशीब आजमावल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. - सुभाष मायकर, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडagricultureशेती