शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंगमुळे आत्महत्या : उदगीर येथून एक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:46 IST

रॅगिंगमुळे विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता.

ठळक मुद्देगणेश म्हेत्रे आत्महत्या प्रकरणरॅगिंग प्रकरणी एक ताब्यात

बीड/उदगीर (जि. लातूर) : उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंगमुळे गणेश म्हेत्रे (२०, रा. नाळवंडी, ता.जि. बीड) या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी रॅगिंग करणाऱ्या अमोल गुमरे (रा. भोगलगाव, ता. गेवराई, जि. बीड ) या विद्यार्थ्यास उदगीर येथून बुधवारी ताब्यात घेतले .

रॅगिंगला कंटाळून विष प्राशन केलेल्या गणेशचा उपचारादरम्यान ८ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी गणेशच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या कॉल रेकॉर्डिंगवरून अमोल  व इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख सपोनि. शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. ज्ञानेश्वर सानप कर्मचारी सुभाष तेलप, धनंजय कारले यांची टीम उदगीर येथील धन्वंतरी महाविद्यालयात तपासासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी चौकशी करून अमोल गुमरे याला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात असून, याप्रकरणात सहभागी असलेल्या इतरांनादेखील लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी  प्राचार्य व संबंधितांवर कडक करवाई करण्याची मागणी नाळवंडी ग्रामस्थांनी केली आहे.

महाविद्यालयाकडून बचावासाठी प्रयत्नमहाविद्यालयात रॅगिंग होत नव्हती, असा मजकूर सर्व विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने लिहून घेतला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य दत्ता पाटील यांना विचारले असता, त्यांनी असा प्रकार केला नसल्याचे सांगितले. 

घटना दुर्दैवी, लक्षवेधी मांडणार - विनायक मेटेवडवणी तालुक्यात शिक्षण घेत असतान दहावीत ९६ टक्के आणि गणितात पैकीच्या पैकी गुण घेऊन राज्यात पहिला आलेला गणेश म्हेत्रे याची आत्महत्या अंतर्मुख करणारी आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रचंड त्रासामुळे त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी अधिवेशनात लक्षवेधी मांडून म्हेत्रे कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचे आ.विनायक मेटे यांनी सांगितले. त्यांनी नाळवंडी येथे जाऊन म्हेत्रे कुटुंबियांचे सांत्वन केले.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीBeedबीड