शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 19:40 IST

वर्षा ही विवाहित असून सासर परभणी आहे. ती सध्या बारावीची परीक्षा देत होती.

बीड : बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून विहिरीच्या कडेला पडलेल्या पर्समध्ये चिठ्ठी सापडल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

वर्षा रामनाथ नागरगोजे (१९ रा.नागरगोजे वस्ती, चिंचाळा ता.वडवणी ह.मु.परभणी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. वर्षा ही विवाहित असून सासर परभणी आहे. तिचे पती पोलीस दलात कार्यरत आहेत. वर्षा सध्या बारावीची परीक्षा देत होती. परभणी येथील शिवाजी विद्यालय हे तिचे परीक्षा केंद्र होते. शनिवारी तिने परीक्षा दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र त्यानंतर ती चिंचाळा येथे कशी आली, याबाबत उशिरापर्यंत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, सोमवारी दुपारी बंडू वाघमोडे हे विहिरीत पाणी किती आहे, हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना वर्षाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. वडवणीचे सपोनि सुरेश खाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी धाव घेतली. पंचनामा करताना त्यांना विहिरीच्या कडेला वर्षाची  पर्स मिळून आली. यामध्ये तिचे परीक्षाचे हॉलतिकीट, महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि एक चिठ्ठी मिळून आली. या चिठ्ठीत काय आहे? याची माहितीही मिळू शकली नसली तरी ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात कसलीच नोंद झालेली नव्हती.

नातेवाईकांचा टाहोवर्षाचे वडील रामनाथ यांचे आजारपणामुळे काही वर्षांपूर्वीच निधन झालेले आहे. आई, बहिण व भाऊ असा तिचा माहेरचा परिवार आहे. परिस्थिती हालाकिची असल्याने आई मिरा नागरगोजे या बीडमधील एका खाजगी रूग्णालयात काम करीत होत्या. यावरच त्यांचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागायचा. वडिलांचे निधन झाल्यानंतर मिरा यांनी परिस्थितीचा सामना केला. मुलांवर त्यांचा जीव होता. आता पोटच्या मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी एकच टाहो फोडला. त्यानंतर इतर नातेवाईकांनीही धाव घेत आक्रोश केला. यामुळे परिसर सुन्न झाला.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीexamपरीक्षा