सुगावचे रहिवासी पांडुरंग चाटे यांना तीन मुले, एक मुलगी आहे. ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह एक एकर जमीन, शेळ्या, मोलमजुरी व गावात दवंडी देऊन करून करीत होते. ते दारूच्या आहारी गेल्यामुळे ते सतत नशेत असायचे. ३१ मे सोमवारी सायंकाळी ते दारू पिऊन घरी आले होते. जेवण करून ते रात्री ११.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात झोपायला जातो म्हणून गेले होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मोठा मुलगा आश्नबा चाटे हा शेताकडे प्रातर्विधीसाठी जात असताना त्याला वडील पांडुरंग चाटे यांनी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनात आले. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून, बर्दापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सुगावच्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST