शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

११ पंचायत समित्यांची एकाच दिवशी अचानक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:46 IST

जिल्ह्यातील ११ पंचायत समिती कार्यालयांची मंगळवारी अचानक तपासणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील ११ पंचायत समिती कार्यालयांची मंगळवारी अचानक तपासणी करण्यात आली. या पाहणीत काही ठिकाणी कर्मचारी गैरहजर आढळले तर काही ठिकाणी अभिलेख व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना समज देण्यात आली तर काहींना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते. सरप्राईज व्हिजिटमुळे दांडीबहाद्दर तसेच कामचुकार करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.जिल्हा परिषद अंतर्गत यंत्रणेचा कारभार कसा चालला आहे. कार्यालयीन कामकाज, वेळेसह शिस्तीचे पालन होते का, या अनुषंगाने मंगळवारी अचानक कार्यालय तपासणी मोहीम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात एकाच दिवशी पंचायत समित्यांची तपासणी करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गेवराई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी बीड व शिरुर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी परळी व अंबाजोगाई पंचायत समित्यांची तपासणी केली. उपमुख्य कार्याकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी धारुर व केज तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी वडवणी, माजलगाव पंचायत समित्यांची पाहणी केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी आष्टी व पाटोदा पंचायत समित्यांची तपासणी केली. तेथील संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना आवश्यक सूचना करण्यात आल्या. या तपासणीचा अहवाल सीईओंकडे सादर करण्यात येणार आहे.अधिकाºयांच्या या भेटींमध्ये काही ठिकाणी कर्मचारी, अधिकारी कार्यालयीन वेळेवर आले नव्हते. काही ठिकाणी पूर्वसूचना अथवा नोंद न करता कर्मचारी गैरहजर होते. त्याचबरोबर काही ठिकाणी कार्यालयीन अभिलेख व्यवस्थित तर काही ठिकाणी अव्यवस्थित दिसून आले. त्याचबरोबर इतर अनियमितता आढळून आल्या. पंचायत समित्यांशिवाय अधिकाºयांनी शाळा, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतींची अचानक तपासणी केली. या वेळी कुठे शिक्षक, ग्रामसेवक तर कुठे डॉक्टर गैरहजर असल्याचे दिसून आले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीzpजिल्हा परिषद