शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ३६ छावण्यांची अचानक तपासणी, जनावरांची बोगस संख्या दाखवून अनुदान लाटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 06:51 IST

चारा छावण्यातून जनावरांची संख्या बोगस दाखवून मलिदा खाण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री बीड व आष्टी तालुक्यात ३६ छावण्यांची अचानक तपासणी करण्यात आली.

- प्रभात बुडूखबीड  -  चारा छावण्यातून जनावरांची संख्या बोगस दाखवून मलिदा खाण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री बीड व आष्टी तालुक्यात ३६ छावण्यांची अचानक तपासणी करण्यात आली. कोल्हारवाडी (ता.बीड) येथील छावणीत ७४४ जनावरे कमी आढळल्याने ही छावणीच रद्द करण्यात आली. इतर ठिकाणचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व शोभा जाधव यांनी बीड तालुक्यातील १६ छावण्या, तर आष्टीतील २० छावण्या बीड उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, शोभा ठाकूर, गणेश महाडिक यांनी तपासल्या. कोल्हारवाडीत छावणी तपासताना शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांनी अडथळा निर्माण केल्याचे जाधव यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आमच्या पथकाला एक तास जनावरे मोजू दिली नाहीत. नंतर अंधार पडताच वीज खंडित केली. टॉर्चच्या उजेडात केलेल्या तपासणीत ७४४ जनावरे कमी आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही छावणी रद्द करण्याचे आदेश दिले.जिल्ह्यात ९३१ छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी ६०० छावण्या सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक १८६ छावण्या बीड तालुक्यात, तर १८५ चारा छावण्या आष्टी तालुक्यात आहेत. बीडच्या छावणीवरील जनावरांची संख्या गुरुवारी ४ लाख १७ हजार ६७१ होती. अचानक केलेल्या तपासणीमुळे दुसºयाच दिवशी शुक्रवारी छावण्यांमधील जनावरांचा आकडा १३ हजार ३४४ हजारांनी कमी झाला. कारवाईच्या भीतीनेच ही संख्या कमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडMaharashtraमहाराष्ट्र