शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांच्या आंदोलनास यश; आरणवाडी तलावाचा फोडलेला सांडवा बांधण्यास सुरूवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 17:12 IST

राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्याला पाण्यापासून धोका होऊ नये म्हणूण पाणी विसर्ग करण्याचे पञ देताच पाटबंधारे विभागाने सांडवा फोडला होता

धारूर : ग्रामस्थांच्या आंदोलनास यश आले असून आरणवाडी साठवण तलावाचा फोडलेला सांडवा बांधण्यास सुरुवात झाली आहे. जनरेट्यामुळे पाटबंधारे विभागाने दहाच दिवसात सांडवा पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले आहे. सांडव्याची उंची पूर्ववत करण्यात येत असल्याने ग्रामस्थांच्या आंदोलनास मोठे यश आले आहे. यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. शनिवारी या कामाची प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. 

आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल सतरा वर्षानंतर पूर्ण झाले. तलाव पूर्ण भरल्याने आरणवाडी, चोंराबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी येथील ग्रामस्थ समाधानी होते. माञ, रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे अनर्थ झाला आणि तलावाचा सांडवा फोडण्यात आला. राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्याला पाण्यापासून धोका होऊ नये म्हणूण पाणी विसर्ग करण्याचे पञ देताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. साठवण तलाव जुना असल्याने तलावाच्या दगडी भिंतीतून पाणी झिरपण्याची भिती व्यक्त करत खालील गावांच्या सुरक्षितेच्या नावाखाली सांडवा फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याला तलावा खालील पाचही गावातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. विरोधाला न जुमानता सांडावा फोडत लाखो लिटर पाणी सोडून देण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी पेटून उठून सांडावा पूर्ववत करावा, राज्य रस्तेविकास महामंडळ आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलन उभारले. 

रमेशराव आडसकर यांनी 15 ऑगस्ट पूर्वी सांडवा पूर्ववत न केल्यास शेतकऱ्यांसह साठवण तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा रस्तारोकोत आंदोलनात दिला होता. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने महसुलने दोन्ही विभागाचे अधिकारी आणि आंदोलक यांच्यात बैठक झाली. यात पाटंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलावाचा धोका कमी झाला असून १४ ऑगस्टपूर्वी सांडवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर शनिवारी सांडव्याची उंची पूर्ववत करण्याचे काम सुरु झाले.आक्टोबरपर्यंत सांडवा पूर्ववत करता येणार नाही म्हणणाऱ्या पाटबंधारे विभागास बाराच दिवसात तलाव सुरक्षित वाटला आणि उंची वाढविण्याचे काम सुरु झाले. 

पाच गावात हरीत क्रांती होणार या तलावामुळे अनेक वर्षाचे स्वप्न डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे पूर्ण झाले आहे. सांडवा फोडल्याने स्वप्न उधळली होती. जनरेट्यामुळे अधिकारशाही झुकली व सांडवा पूर्ववत होत असल्याने डोंगरात हरीतक्रांती होण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. हे आंदोलन कोणाविरूध्द नव्हते नियम व कायद्याने हक्कासाठी होते. हा मोठा विजय आहे अशा भावना सुनिल शिनगारे, बालासाहेब चव्हाण, विजय शिनगारे, सादेक इनामदार यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी