शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लोकसहभागातून मिळणार गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:11 IST

बीड जिल्हा परिषदेच्या एस. सी., एस. टी. व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेश लोकसहभागातून देण्यासाठी जि. प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात ४ जुलै रोजी त्यांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना केल्या.

ठळक मुद्देबीड जिल्हा परिषद : राजेसाहेब देशमुख यांनी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्हा परिषदेच्या एस. सी., एस. टी. व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेश लोकसहभागातून देण्यासाठी जि. प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात ४ जुलै रोजी त्यांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना केल्या.शासनातर्फे एस. सी., एस. टी. व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थिनींना गणवेश दिला जातो. परंतु खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश नियमानुसार मिळत नसल्यामुळे या मुलांचे चेहरे हिरमुसले व्हायचे. त्यांचे हे वय अल्लड असल्यामुळे आपल्याला गणवेश मिळाला नाही याची खंत त्यांच्या मनावर कोरली जायची. बाल मनावर त्यांच्या शैक्षणिक आयुष्याच्या सुरुवातीपासूनच असले प्रकार होऊ नयेत यासाठी सर्वांनाच गणवेश कसे मिळतील या संदर्भात आढावा घेतला असता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या ६५ हजाराच्या जवळपास आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश दिला तरी हा खर्च दोन कोटी रुपयांच्या जवळपास जातो. लहान मुलांच्या भावनांचा विचार केला तर त्या तुलनेत ही रक्कम फार काही मोठी नाही. लोकसहभागातून हे कार्य जर पार पाडले तर कोणावरही बोजा पडणार नाही, असे सभापती राजेसाहेब देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बुधवारी जिल्हा परिषदेत बैठकीस शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, सर्व शिक्षा अभियानचे हिरालाल कराड, जिल्ह्यातील सर्व बीईओ, कर्मचारी उपस्थित होते. जि.प. शाळेत शिक्षण घेणारी मुले ही सर्वसाधारणपणे गरीब, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील असतात. ज्या विद्यार्थ्यांना तालुक्यावर जाऊन शिक्षण घेता येत नाही ती सर्व मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत येतात. गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य घेण्याची त्यांच्या पालकांची आर्थिक कुवत नसते. हे लक्षात घेऊन लोकसहभागातून गणवेश देण्याचा आम्ही राज्यात सर्वप्रथम बीड जिल्ह्यात प्रयोग करीत आहोत. सर्व देवस्थान ट्रस्ट, रोटरी, लायन्स, विविध सामाजिक संस्था, शिक्षणप्रेमी, सेवाभावी संस्थांना विद्यार्थ्यांच्या या गणवेशाचा भार उचलण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत. तसेच वाढदिवसासारख्या उपक्रमाचा खर्च टाळून त्यातून या विद्यार्थ्यांना गणवेश दिले तर हा प्रश्न सहज सुटू शकतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाBeedबीडStudentविद्यार्थी