शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांकडून तलाठ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:45 IST

गेवराई : अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर का पकडले? म्हणून वाळू माफियांनी जातेगाव सज्जाचे तलाठी व्ही.व्ही. आमलेकर यांना ट्रॅक्टरमधून खाली ओढत बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी जातेगाव नजीक सेलूतांडा ते गेवराई रोडवर घडली. याप्रकरणी दोन आरोपी विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ...

गेवराई : अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर का पकडले? म्हणून वाळू माफियांनी जातेगाव सज्जाचे तलाठी व्ही.व्ही. आमलेकर यांना ट्रॅक्टरमधून खाली ओढत बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी जातेगाव नजीक सेलूतांडा ते गेवराई रोडवर घडली. याप्रकरणी दोन आरोपी विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील एकाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान,तालुक्यात वाळू माफियांकडून महसूल अधिकारी यांना वारंवार होणारी मारहाण व जीवे मारण्याची धमकी यामुळे अधिकाऱ्यांना कामे करणे जिकरीचे बनले आहे.

आमलेकर हे जातेगाव तलाठी सज्जा हद्दीत दैनंदिन कामे करत असताना सेलूतांडा ते गेवराई रोडवर दोन विनानंबरचे टॅÑक्टर अवैध वाळू घेऊन जाताना त्यांनी पकडले. यानंतर ट्रॅक्टर चालक अशोक जगताप याने मालकाला याची माहिती देताच मालक बंडू घाटूळ हे (एमएच२३/एए११) या क्र मांकाच्या दुचाकीवरुन घटनास्थळी दाखल झाला. यानंतर घाटूळ याने तलाठी आमलेकर यांना ‘तु ट्रॅक्टर का पकडलेस’ म्हणून धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच ट्रॅक्टरच्या चाकाखाली घालून मारण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र प्रसंगावधान राखल्याने माझा जीव वाचला असून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी बंडू घाटूळ व अशोक जगताप विरोधात तलवाडा ठाण्यात गुन्हा दाखल झाला.क्लिप ‘व्हायरल’अवैध वाळू घेऊन चाललेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर आरोपी बंडू घाटूळ याने तलाठी आमलेकर यांना ट्रॅक्टरमधून खाली ओढत केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झालाया घटनेचा निषेध करीत महसूल राजपत्रित अधिकारी, कर्मचारी, तलाठी संघटनेने शनिवारी लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदनही त्यांनी तयार करुन जिल्हा नियोजन अधिका-यांना दिले आहे.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडा