राज्यभर भगव्या विचाराचे वादळ अधिक गतीने पसरतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 11:43 PM2019-10-08T23:43:52+5:302019-10-08T23:44:49+5:30

मिळालेल्या संधीचा लाभ लोककल्याण, विकासाची अधिक कामे करून घेणार असून याकामी मला आपले आशिर्वाद आणि खंबीर साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

The storm of saffron thinking is spreading more and more across the state | राज्यभर भगव्या विचाराचे वादळ अधिक गतीने पसरतंय

राज्यभर भगव्या विचाराचे वादळ अधिक गतीने पसरतंय

Next
ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : शिवसेनेने दिलेल्या संधीचे विकासासाठी करणार सोने; सर्वांगीण विकासाच्या विविध योजनांसाठी प्रयत्न

बीड : येत्या २१ तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊ घातली असून राज्याच्या कानाकोपऱ्यात भगव्या विचाराचे वादळ अधिक गतीने पसरत आहे. शिवसेना पक्षाने मला संधी दिली आहे. मिळालेल्या संधीचा लाभ लोककल्याण, विकासाची अधिक कामे करून घेणार असून याकामी मला आपले आशिर्वाद आणि खंबीर साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
रविवारी शहरातील कबाड गल्ली भागातील आदर्श नवरात्र महोत्सवात क्षीरसागर यांच्याहस्ते देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर माजी सभापती बाळासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी त्यांनी सदीच्छा भेट दिली. यावेळी जयदत्त क्षीरसागर बोलत होते. याप्रसंगी विलास बडगे, प्रा.जगदीश काळे, माजी सभापती बाळासाहेब जाधव, बंडूभाऊ कदम आदींची उपस्थिती होती.
नवरात्रीच्या पवित्र काळात प्रत्येक घरोघरी आई भवानीची मनोभावे सेवा केली जाते. नवरात्र उत्सवाची या भागाची परंपरा असून स्व.किसन जाधव, स्व.राजेंद्र जाधव यांनी सुरू केलेल्या उत्सवाची परंपरा आजही बाळासाहेब जाधव, बंडू कदम यांनी सर्वाना सोबत घेऊन मोठ्या उत्साहाने कायम ठेवली आहे. आदर्श नावाप्रमाणे उत्सव ही आदर्श पध्दतीने संपन्न होत असल्याचे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
पुढे बोलतांना क्षीरसागर म्हणाले की, शहराच्या मूलभूत गरजांसोबतच सर्वांगीण विकासाच्या विविध योजना शासन दरबारी पाठपुरावा करून पदरात पाडून घ्याव्या लागतात. शहरात सुरू असलेल्या अमृत पाणी पुरवठा, ड्रेनेज योजनेमुळे शहराची भविष्यातील व्याप्ती आणि लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन केले आहे. आतापर्यंत विकासाच्या अनेक योजना प्रत्यक्षात शहरात आणून विकास करण्याचा व सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यापुढेही विकासाठी प्रयत्नशील राहील. भविष्यात संधी आणि आशिर्वादाचा मला विश्वास असल्याचे ते जयदत्त क्षीरसागर यावेळी म्हणाले.

कबाड गल्ली परिसराने मला मागील काळापासून स्नेह दिला असून हा भाग राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावी आणि मध्यवर्ती असून शिवसेनेचा उगम येथूनच झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष याच भागातून शहरात वाºयासारखा पसरला. शहराला दिशा देण्याचे काम या भागाने आजपर्यत केले असून हाच वारसा पुढील काळात ही जोपासला जावा. कबाड गल्ली परिसराशी माझे मागील काळापासून स्नेहाचे नाते असून स्नेहाचा हा धागा भविष्यातही अधिक मजबूज राहील असा ठाम विश्वास आहे.
- जयदत्त क्षीरसागर, रोहयो मंत्री

Web Title: The storm of saffron thinking is spreading more and more across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.