शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

केजमध्ये भर उन्हात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:29 IST

मांजरसुंबा ते अंबाजोगाई आणि केज ते कळंब या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी पूर्णत: उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी बारा वाजता भर उन्हात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकेज विकास संघर्ष समितीचे आंदोलन : एकतर्फी पूर्ण रस्ता वाहतुकीस उपलब्ध करा

केज : मांजरसुंबा ते अंबाजोगाई आणि केज ते कळंब या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी पूर्णत: उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी बारा वाजता भर उन्हात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.अंबाजोगाई -मांजरसुंबा व केज - कळंब या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम दीड ते दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या रस्त्याचे काम नियोजनाच्या अभावामुळे संथ गतीने होत आहे. यातच कामाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात रस्ते खोदकाम करून ठेवल्याने जनतेला रस्त्यावरील खड्डे व धुळीने त्रस्त व्हावे लागत आहे. अवजड वाहने ओलांडून पुढे जाताना दुचाकी धारकांना जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने खोदलेल्या रस्त्यावरुन वाहने गेल्या नंतर रस्त्यावर पाणी टाकले जात नसल्याने धुळीचे लोट उठत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांना धुळीमुळे व रस्त्यावरील खड्ड्यामुळे मणक्याचे व श्वसनाचे आजार जडले आहेत.त्यामुळे मांजरसुंबा ते अंबाजोगाई व केज ते कळंब रस्ता एकतर्फी वाहतूकीसाठी पुर्णता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी भर उन्हात दुपारी बारा वाजता तब्बल अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती.यावेळी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता अशोक दास यांनी सदर रस्ता लवकरच वाहतूकीस पूर्णत: उपलब्ध करून देण्याच्या सुचना गुत्तेदारांना दिल्याचे सांगितले. तसेच धुळ उडू नये यासाठी खोदलेल्या रस्त्यावर पाणी मारण्याबाबतही सांगितल्याचे ते म्हणाले. मांजरसुंबा ते अंबाजोगाई व केज ते कळंब रस्त्यावरील पुलाच्या ठिकाणचे पॅचेस भरुन एकतर्फी रास्ता वाहतूकीस पूर्णत: खुला करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलेया आंदोलनात हनुमंत भोसले यांच्यासह महेश जाजू, नासेर मुंडे, एम डी घुले, रंगनाथ राऊत, भाई मोरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसेसह २०० पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला, पो उपनिरीक्षक माळी, पो उपनिरीक्षक जाधव यांनी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

टॅग्स :Beedबीडroad transportरस्ते वाहतूकagitationआंदोलन