शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आरणवाडी तलावाच्या मागणीसाठी शिवसेनेचा तासभर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:55 IST

आरणवाडी साठवण तलावाचे रखडलेले काम सुरू करा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख नारायण कुरु ंद यांच्या उपस्थितीत चोरांबा येथे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

धारूर : आरणवाडी साठवण तलावाचे रखडलेले काम सुरू करा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख नारायण कुरु ंद यांच्या उपस्थितीत चोरांबा येथे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.आरणवाडी साठवण तलावाचे काम गेल्या २० वर्षांपासून रखडलेले आहे. या परिसरातील आरणवाडी, चोरांबा, थेटेगव्हाण, ढगेवाडी, सोनिमोहा, पारगाव इ. गावांसाठी हा तलाव वरदान ठरणार असून, परिसरातील जनतेचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. या परिसरातील जनतेला पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागते. या मुद्यावर शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख नारायण कुरुंद यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी तालुका प्रमुख नारायण कुरु ंद, तरु ण कैलास चव्हाण, राहुल चव्हाण, शेतकरी संघटनेचे काशीराम सिरसट, रामदास तिडके आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी तालुका प्रमुख विनायक ढगे, शहर प्रमुख बंडू शिनगारे, राजकुमार शेटे, गणेश पवार, बाबा सराफ, सीताराम चव्हाण, दिनेश चव्हाण, प्रकाश चुंचे, गणेश मोरे, आरणवाडीचे सरपंच फुटाने, सदाभाऊ शिनगारे, चंद्रकांत हरणावळ, अंकुश चव्हाण, धनराज मायकर, त्रिंबक शिंदे यांच्यासह शेतकरी, शिवसैनिक उपस्थित होते, यावेळी तहसीलदार लंगडापुरे व लघु पाट बंधारे विभागाचे कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक कुकलारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :BeedबीडShiv Senaशिवसेनाwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन