शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

फेरमुल्यांकनासाठी तेलगावात शेतकरी-रेल्वे संघर्ष कृती समितीचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 16:58 IST

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या बीड, वडवणी, धारुर, परळी तालुक्यातील जमिनींचे पुर्नमुल्यांकन करावे, सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा तसेच बाजार भावाच्या सहा पट रक्कम द्यावी या मागण्यांसाठी आज दुपारी तेलगाव चौफळा येथे शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

माजलगाव (बीड) : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या बीड, वडवणी, धारुर, परळी तालुक्यातील जमिनींचे पुर्नमुल्यांकन करावे, सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा तसेच बाजार भावाच्या सहा पट रक्कम द्यावी या मागण्यांसाठी आज दुपारी तेलगाव चौफळा येथे शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी संपादित केलेल्या काही जमिनी ह्या कुंडलिका व अप्पर कुंडलिका धरणाच्या सिंचन खालील येत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना निजामकालीन मावेजा दिला आहे. वास्तविक पाहता या भागातील जमिनीचा बाजार भाव लाखोच्या घरात आहे यामुळे या जमिनींचे फेर मुल्यांकन करावे अशी मागणी शेतकरी व रेल्वे संघर्ष समिती यांनी केली. तसेच मावेजा सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा देण्यात यावा व बाजार भावाच्या सहा पट रक्कम देण्यात यावी व कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वे विभागात नौकरीस घ्यावे अशा मागण्याही आंदोलकांनी यावेळी केल्या. आंदोलनाने जवळपास दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.  

अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही सततचा दुष्काळ आणि त्यात तुटपुंजा मावेजा यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. वडवणी येथील शेतकरी मनोहर लक्ष्मण पतंगे या शेतकऱ्याचा रेल्वेचा योग्य मावेजा मिळत नसल्या संबंधीच्या धास्तीने ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले तरी सुध्दा संबंधित अधिकाऱ्याने याची कुठलीही दखल घेतली नाही असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. 

काम होऊ देणार नाही मागील महिन्यात दिनांक 19 मार्च रोजी शेतकऱ्यांनी रेल्वेचे काम बंद आंदोलन केले होते. तरीही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी त्याची कुठलीच दखल घेत नसल्यामुळे रेल्वे संघर्ष समितीच्या व शेतकऱ्यांच्या वतीने जो पर्यंत योग्य मावेजा मिळत नाही व सदरील कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वे विभागात नौकरी देण्यात येत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी रेल्वेचे कुठलेच काम चालु देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.  

यावेळी शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विनायक शेळके, सचिव विठ्ठल मस्के, शामसुंदर इंदाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, जि.प.सदस्य जयसिंह सोळंके, शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव, विनायक मुळे, बाळासाहेब मेंडके, सुनिलराव खंडागळे, भाजपाचे नितीन नाईकनवरे,डाॅ.उध्दव नाईकनवरे,डाॅ.रणजीत मस्के,विठ्ठल लगड,प्रशांत सावंत,बप्पासाहेब डावकर यांच्यासह सर्व पक्षीय नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व हजारो शेतकऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला होता. मौजे मोची पिंपळगांव, घोडकाराजुरी, शिवणी, जरुड, बाभुळखुंटा, मौज, ब्रम्हगाव, ढेकणमोहा, बकरवाडी, घाटसावळी, पोखरी, मैंदा, परभणीतांडा, वडवणी, बाहेगव्हाण, मोरवड, हिवरगव्हाण, पुसरा, बाबी, उपळी, लोणवळ,तेलगाव, कोथिंबीरवाडी, भोपा, चाटगाव या गावातील शेतकरी सहभागी होते 

टॅग्स :agitationआंदोलनState Governmentराज्य सरकारBeedबीडMONEYपैसा