शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

बीड जिल्ह्यात व्यसनापायी तरुणाईचे गुन्हेगारीकडे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:12 IST

परिस्थिती आणि दारू, गांजा यासरख्या व्यसनांमुळे तरूणाई गुन्हेगारीकडे पाऊले टाकत आहे. मागील तीन गुन्ह्यांतून हे उघड झाले आहे. व्यसनापायी दागिने लंपास करणे, चोरी करणे लुटमार करणे यासारखे गंभीर गुन्हे तरूण करू लागले आहेत.

ठळक मुद्देतीन गुन्ह्यांतून उघड : दागिने लंपास, चोरी, लुटमारीचे केले गुन्हे; गुन्हेगारीऐवजी चांगले कार्य करीत नाव कमविण्याचे आवाहन

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परिस्थिती आणि दारू, गांजा यासरख्या व्यसनांमुळे तरूणाई गुन्हेगारीकडे पाऊले टाकत आहे. मागील तीन गुन्ह्यांतून हे उघड झाले आहे. व्यसनापायी दागिने लंपास करणे, चोरी करणे लुटमार करणे यासारखे गंभीर गुन्हे तरूण करू लागले आहेत. या चारही गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, तरूणाचे गुन्हेगारीकडे पडणारे हे पाऊल थांबविण्यासाठी उपाययोजना करून त्यांचे मनपरिवर्तन करण्याची गरज आहे.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शखाली शाळा, महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाते. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून कायदा व सुव्यवस्थेबद्दल माहिती दिली जाते. मात्र तरीही काही तरूण गुन्हेगारी वळत असल्याचे दिसत आहे.हे गुन्हेगार रेकॉर्डवर नसल्याने त्यांचा तपास लावण्याचे आव्हानही पोलिसांसमोर रहात आहे. आतापर्यंत तरी हे आव्हान पोलिसांनी यशस्वी पेलली आहेत, मात्र नवखे गुन्हेगार वाढल्यास गुन्हेगारीचा टक्काही वाढल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चत...!घटना क्रमांक - १साधारण पंधरा दिवसांपूर्वी दिलीप बाजीराव सुरासे (रा.खोकडपुरा, औरंगाबाद) हे कार चालक पान खाण्यासाठी नगर नाक्यावरील टपरीवर आले. मात्र सर्व पानटपऱ्या झाल्याने सुरासे हे तिथेच कारमध्ये मोबाईलवर बोलत बसले होते. याचवेळी विकी राजू कांबळे (२५ रा.राजुरीवेस, बीड) व सुयोग मच्छिंद्र प्रधान (१८ रा.साईपॅलेसच्या पाठिमागे, बीड) या दोन चोरट्यांनी त्यांना लुटले. त्यांनी रोख १० हजार रुपए आणि दोन मोबाईल असा ३० हजार रूपंयाचा ऐवज लंपास केला होता. पोलीस तपासातून त्यांनी ही चोरी केवळ गांजा पिण्यासाठी पैसे नसल्याने केल्याचे निष्पन्न झाले होते.घटना क्रमांक - २केवळ दारू आणि गांजा पिण्यासाठी पैसे नसल्याने शेख जुबेर शेख अब्दुल (२० रा.मसरतनगर) व अमीर खान अकबर खान (रा.इस्लामपुरा) हे दोन तरूण लुटमारीचा गुन्हा करू लागले. २० सप्टेंबर रोजी श्रीराम नगर भागात अश्विनी रमेश लाखे या घरासमोर झाडू मारत होत्या. याचवेळी हे दोघे तिथे दुचाकीवरून आले. आजुबाजुला कोणी नसल्याची संधी साधून त्यांनी लाखे यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून घेत पोबारा केला. भल्या पहाटे ही घटना घडल्याने दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजवरून दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.घटना क्रमांक - ३तिसरी घटना परळीत घडली. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर किशोर नामदेव केदार (२३, रा. पिंपरखेड ता.घनसावंगी जि.जालना) याला दारूचे व्यसन जडले. जुगारही खेळायाचा. हे खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी पैसे कमी पडल्याने किशोरने दीड महिन्यांपासून दुचाकीचोरी करणे सुरू केले. चार दुचाकी चोरल्याही. मात्र पाचवी दुचाकी चोरण्यापूर्वीच बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या. केवळ दारू आणि जुगार खेळण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने तो गुन्हेगारीकडे वळल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासावरुन समोर आले आहे.पालकांनी लक्ष देण्याची गरजपालकांनी आपला पाल्य कोठे जातो, काय करतो, कोणासोबत असतो, त्याला व्यसन आहे का, ते पूर्ण करण्यासाठी तो पैसा कोठून आणतो, घरून पैसे दिले जात नसतील तो ऐश कोणत्या पैशांवर करतो, यासारखी विविध माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे आहे.सर्वच पाल्य वाईट नाहीत, मात्र मागील काही घटनांवरून पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसते. सर्वांनी सजग राहणे ही काळाची गरज असून यामुळे गुन्हेगारी नक्कीच कमी होईल.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी