शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जातीयवाद संपविण्यासाठी पाऊल; बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट!

By सोमनाथ खताळ | Updated: February 27, 2025 11:24 IST

बीड पोलिस अधीक्षकांचा निर्णय; आडनाव नकोच, फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट; काय आहे संकल्पना

बीड : जिल्ह्यातील जातीयवाद संपविण्याआधी पोलिसांच्या मनातून ‘जात’ काढण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पहिल्या नावाने बोलण्याचा आदेश काढला. त्यानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत कार्यालयीन व प्रत्येक ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलवर आता पहिल्या नावाची पाटी लागणार आहे. त्यामुळे सामान्य लोकही पहिल्या नावाने बोलतील आणि कोणाचीही ‘जात’ समजणार नाही. यातून सलोखा वाढणार आहे.

लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात जातीयवाद वाढला आहे. विधानसभेत तो आणखी बळकट झाला. सध्या तर पोलिस दलातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही ‘जाती’चे आरोप होत आहेत. असे असतानाच ९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि पोलिस अधीक्षक बदलले. २१ डिसेंबर २०२४ रोजी नवनीत काँवत यांची बीडला नियुक्ती झाली. त्यांनी आगोदर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या नावाने बोलण्यासंदर्भात आदेश काढून आवाहन केले. याला यशही आले. त्यानंतर आता त्यांनी प्रत्येक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या टेबलवर केवळ पहिल्या नावाची नेमप्लेट देण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्च पासून याची अंमलबजावणी होणार आहे.

काय आहे संकल्पना ?आडनावाने बोलल्याने अनेकांची जात लक्षात येते. हे न समजता सलोखा राहावा, यासाठी पहिल्या नावाने बोलण्याची संकल्पना हाती घेतली. याला यश आल्यानंतर आता प्रत्येक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह बीट अंमलदारांना पहिल्या नावाची नेमप्लेट पोलिस दलाकडून दिली जाणार आहे. हे नाव निळ्या रंगात राहणार असून नावाच्या बाजूला 'महाराष्ट्र पोलिस' असा लोगो असेल. अभिमान वाटावा आणि काम करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी हे केले जाणार आहे.

अंमलदारांना पेन, पेपरही मिळणारपोलिस ठाण्यात काम करणारे अंमलदार हे स्वखर्चातून पेन, पेपर खरेदी करतात. परंतु, शासकीय काम असल्याने त्यांना हा भुर्दंड बसू नये, यासाठी पेन, पेपरसह इतर स्टेशनरी दिली जाणार आहे. त्याची खरेदीही करण्यात आली आहे.

आदेश काढला आहेमी स्वत: सर्वांना पहिल्या नावाने बोलतो. तसेच, इतरांनीही बोलण्यासंदर्भात आदेश काढला आहे. आता प्रत्येक बीट अंमलदार यांना त्यांच्या टेबलवर ठेवण्यासाठी पहिल्या नावाची नेमप्लेट देत आहोत. त्याखाली महाराष्ट्र पोलिस असे लिहिलेले असेल.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड

टॅग्स :Beed policeबीड पोलीसBeedबीड