शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

परळीत बाराव्या दिवशीही ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:26 IST

मराठा आरक्षणासाठी परळीत रविवारी बाराव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरु होते. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिवसभरात आंदोलकांशी दोन वेळा भेट घेऊन चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक मागण्यांबाबत ठाम होते.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी

बीड : मराठा आरक्षणासाठी परळीत रविवारी बाराव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरु होते. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिवसभरात आंदोलकांशी दोन वेळा भेट घेऊन चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक मागण्यांबाबत ठाम होते. दरम्यान, धारुर तालुक्यात कारी, गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे आंदोलन करण्यात आले. लोखंडी सावरगाव ते परळीपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. सोमवारी बीड व धनेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शनिवारी मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे संदेशपत्र घेऊन राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर रविवारी परळीत दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची भेट घेत म्हणणे ऐकून घेतले. मुंबईच्या सर्वपक्षीय बैठकीतील निर्णयाची प्रत त्यांनी आंदोलकांना वाचून दाखवली. या मागण्यांची पूर्तता होत असल्याने मराठा समाज बांधवांनी परळी येथील आपले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंतीही डॉ. भापकर यांनी केली.

दरम्यान, आमच्या राज्य पातळीवरील समन्वयकांशी तसेच समाज बांधवांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय कळवला जाईल अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे दुपारी उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे व तहसीलदार शरद झाडके भेटले. मात्र, आंदोलकांनी निर्णयातील मुद्द्यांमध्ये दुरुस्तीची मागणी केली. नंतरही पेच कायम राहिल्याने सायंकाळी पुन्हा विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली.

मात्र, कोणताही निर्णय न झाल्याने सायंकाळी सात वाजता आयुक्त निघून गेले. शासनाचे लेखी पत्र जोपर्यंत समाजाला मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे समन्वयक आबासाहेब पाटील यावेळी म्हणाले. दिवसभरात आंदोलकांना भेटण्यासाठी विविध ठिकाणाहून मराठा समाज बांधव, विविध पदाधिकारी येत होते. यात महिलांचा मोठा सहभाग होता.

बीडमध्ये आज लाक्षणिक उपोषणबीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.या उपोषण आंदोलनात जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवासह समाजाच्या आरक्षण प्रश्नांच्या आंदोलनास पाठींबा देणाऱ्या विविध संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विलास बडगे, दिनकर कदम, दिलीप गोरे, विनोद मुळूक, सुभाष सपकाळ, अ‍ॅड. महेश धांडे, भास्कर जाधव, नरसिंग नाईकवाडे, अरूण डाके, विलास विधाते, अ‍ॅड. बप्पासाहेब औटे, गणपत डोईफोडे, संजय गव्हाणे, सुधिर भांडवले, काकासाहेब जोगदंड, शेषेराव फावडे, तानाजी कदम, सुनील झोडगे, जीवनराव बजगुडे, सतीष काटे, सिध्देश्वर आर्सूळ, अरूण बोंगाणे, अशोक होके, भारत जगताप, पंजाब शिंदे, अरूण लांडे, सुग्रीव रसाळ, अ‍ॅड. विष्णूपंत काळे, विठ्ठल बहीर, मनेश भोसकर, राहूल नवले, गणेश गरूड, राम वाघ, सचिन चव्हाण, रवि शिंदे, नानासाहेब जाधव, नागेश तांबारे, जयराम डावकर आदींनी निवेदनाद्वारे केले आहे.

धनेगाव फाट्यावर आज रास्ता रोकोकेज तालुक्यातील कळंब-अंबाजोगाई राज्य महामार्गावरील दनेगाव फाटा येथे युसूफवडगाव जिल्हा परिषद गटातील पंचेवीस गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ३० जुलै रोजी सकाळी दहा वाजता धनेगाव फाट्यावर सामुहिकरित्या मुंडण, राज्य सरकारचा दशक्रिया विधी व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :BeedबीडMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMarathwadaमराठवाडा