शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य; मनोज जरांगे यांच्या विरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 20:28 IST

मुंडे समर्थकांचे परळी पोलीस स्टेशनमध्ये पाच तास ठिय्या.

परळी:  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी(दि.4) परभणी येथे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी आज(दि.5) परळी शहर पोलीस ठाण्यात तुकाराम बाबुराव आघाव यांनी तक्रार दाखल  केली आहे. 

आघाव यांच्या तक्रारीवरुन मनोज जरांगेंविरोधात भारतीय न्याय संहिता 2023, सेक्शन 356 (2) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पाच तास कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. मुंडे समर्थकांनी सांगितले की, परभणी येथील मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी व समाजाविषयी 'फिरू देणार नाही, घरात घुसून मारू' अशाप्रकारचे वक्तव्य केले. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे भडकाऊ वक्तव्य केले गेले. या वक्तव्याचा निषेध करत मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मुंडे समर्थकांनी रविवारी परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला होता. रविवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले, ते सायंकाळ 6 पर्यंत सुरू होते. यावेळी मनोज जरांगे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. अखेर सायंकाळी जरांगे पाटलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आंदोलकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडparli-acपरळी