शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

बीड - नगर रेल्वेसाठी राज्य शासनाकडून ७७ कोटीचा निधी रेल्वे बोर्डास वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 13:42 IST

परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून या प्रकल्पासाठी  राज्य शासनाने ७७ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी रेल्वे बोर्डा वितरित केला आहे. यासंबंधी आदेशही गृह विभागाने निर्गमित केले आहेत.  

बीड : परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून या प्रकल्पासाठी  राज्य शासनाने ७७ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी रेल्वे बोर्डाकडे  वितरित केला आहे. यासंबंधी आदेशही गृह विभागाने निर्गमित केले आहेत.  

परळी - बीड - नगर या रेल्वे मार्गाकरिता २८२६ कोटी रु पये एवढा खर्च अंदाजित असून यातील १४१३ कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने मंत्रिमंडळ स्तरावर घेतला आहे. त्यानुसार या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने आॅक्टोबर २०१७ पर्यंत एकूण ६३९ कोटी ६४ लाख रु पये निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पासाठी याच कालावधीत रेल्वे विभागाने ७१६ कोटी ८४ लाख रु पये इतका निधी वितरित केला आहे. 

राज्य शासनाच्या हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन २०१७-१८ करिता प्रकल्पासाठी तरतूद  झालेल्या निधीपैकी ७७ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी वितरित करण्यात आला. यामुळे केंद्र व राज्य शासनाचे मिळून आतापर्यंत १४३३ कोटी ६८ लाख रुपये या प्रकल्पाला मिळाले आहेत. या रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून २०१९  पर्यंत रेल्वे प्रत्यक्ष धावण्याचे जिल्हा वासियांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्णत्वास येणार आहे. हा निधी रेल्वे बोर्डाकडे वर्ग करण्यात आला  असून तसे आदेश गृह विभागाने निर्गमित केले आहेत.