शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

SSC Exam: सोशल मीडियावरचा टाइमटेबल पाहिला, हिंदीचा पेपर बुडाला; अनेकांचे वर्ष वाया

By अनिल भंडारी | Updated: March 8, 2023 19:02 IST

निष्काळजीपणामुळे अनेक मुलांचे एक वर्ष जाणार वाया

बीड : सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्याने बुधवारी अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला. तर घाईघाईने उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा नियमांमुळे केंद्रात प्रवेश मिळू शकला नाही.

सोशल मीडियावर एक वेळापत्रक परीक्षेच्या आधीपासून फिरत आहे. या वेळापत्रकात प्रथम सत्रात इयत्ता दहावीच्या द्वितीय भाषेचा पेपर गुरुवार, दि. ९ मार्च २०२३ रोजी दाखविण्यात आला आहे. या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला गेले नाहीत. विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीचा हिंदी (द्वितीय भाषा) विषयाचा पेपर बुधवार, ८ मार्च रोजी होता. त्यामुळे ही बाब लक्षात आल्याने काही शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना फोनद्वारे संपर्क करून दहावीच्या हिंदीचा पेपर ८ मार्च रोजी असल्याचे व परीक्षार्थी परीक्षेला गेला का? याची खात्री केली. जे गेले नाही, त्यांना परीक्षेसाठी ताबडतोब वेळेवर पोहोचण्याचे कळविले. हिंदीचा पेपर ९ मार्च रोजी नसून तो ८ मार्च रोजीच असल्याचे समजल्यानंतर विद्यार्थी व पालकांची धावपळ झाली. शहरातील एका केंद्रावर एक विद्यार्थी परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा पोहोचल्याने त्याला बोर्डाच्या नियमानुसार प्रवेश मिळू शकला नसल्याने रडू कोसळले. केवळ सोशल मीडियावरील वेळापत्रक आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र हिंदीचा पेपर बुडाला.

अधिकृत वेळापत्रक इथे असते कीविभागीय शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. परीक्षेसाठीच्या हाॅल तिकिटावर मागील बाजूस छापील वेळापत्रक असते. तसेच बोर्डाच्या संकेतस्थळावरही अधिकृत वेळापत्रक असते. त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या दर्शनी भागातही वेळापत्रक डिस्पले केलेला असतो. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी काळजी घेतली पाहिजे.

पालकांनीदेखील खात्री करायला हवीपरीक्षेपूर्वी देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल, त्या वेळापत्रकावरून खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे, अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशा सूचना शिक्षण मंडळामार्फत केल्या जातात. अधिकृत वेळापत्रकांनुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेला जावे. पालकांनीदेखील वेळोवेळी खात्री करावी. सोशल मीडियावर फिरणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे शिक्षणप्रेमींनी सांगितले.

दहावीचे ९४३ गैरहजर बारावीचे ४१६इयत्ता दहावीच्या द्वितीय भाषा हिंदीच्या परीक्षेला ३५८९० पैकी ३४९४७ विद्यार्थी उपस्थित होते, तर ९४३ विद्यार्थी गैरहजर होते. इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या परीक्षेला २२५१० पैकी २२१०० विद्यार्थी हजर होते. ४१६ विद्यार्थी गैरहजर होते.

टॅग्स :ssc examदहावीBeedबीड