शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी खास! गोदाम बांधा, मिळेल साडेबारा लाख रुपये अनुदान, लवकर करा अर्ज

By शिरीष शिंदे | Updated: September 19, 2023 13:39 IST

गोदाम बांधकामासाठी अधिकाधिक १२.५० लाख किंवा बांधकामास आलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे.

बीड : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य २०२३-२४ या वर्षासाठी २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी कृषी विभागाच्या वतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. गोदाम बांधकामासाठी अधिकाधिक १२.५० लाख किंवा बांधकामास आलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

कोणाला मिळले लाभ ?जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत. केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडार योजना व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्जदारांनी प्रथम राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच संबंधित अर्जदार कंपनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज करू शकतील. अर्ज दाखल करताना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे प्राधिकृत अधिकारी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिझाइन्स व खर्चाच्या अंदाजपत्रकासह प्रस्ताव सादर करावा.

असा करावा अर्ज ज्या कार्यक्षेत्रात शेतकरी उत्पादक कंपनी, संघ आहे त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील विहित प्रपत्रात अर्ज सादर करावा. अर्जासोबत शेतकरी उत्पादक कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, कंपनीच्या लेटर हेडवर अर्ज, शेतकरी उत्पादक कंपनी कमिटी ठराव, मागील तीन वर्षांचे ऑडिट, ज्या जागेवर गोदाम उभारणी करायची आहे त्या जागेचा सातबारा व आठ-अ उतरा जोडावा.

हमी पत्र देणे बंधंनकारकगोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषी माल साठवणुकीसाठी योग्य व माफक दरात उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. याबाबत १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर हमी पत्र देणे बंधंनकारक आहे. जास्तीत जास्त नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघांनी गोदाम बांधकामासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडState Governmentराज्य सरकार