शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सोनोग्राफी यंत्र तीन महिन्यांपासून धूळ खात; गरोेदर महिलांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:43 PM

येथील उपजिल्हा रु ग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सोनोग्राफी यंत्र उपलब्ध करु न दिलेले आहे. मात्र ते रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तीन महिन्यापासून धूळ खात पडून आहे.

ठळक मुद्देरुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष : खाजगी सेंटरवर रु ग्णांची लूट; लक्ष देण्याची मागणी

गेवराई : येथील उपजिल्हा रु ग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सोनोग्राफी यंत्र उपलब्ध करु न दिलेले आहे. मात्र ते रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तीन महिन्यापासून धूळ खात पडून आहे. यामुळे रु ग्णांसह गरोदर महिलांचे मोठे हाल होत आहेत. तपासणीनंतर डॉक्टर सोनोग्राफी करण्यासाठी रु ग्णांच्या हातात चिठ्ठी देत आहेत. परिणामी रुग्ण, गरोदर माता तसेच प्रसुतीसाठी रु ग्णालयात दाखल झालेल्या महिलांना खासगी केंद्रातून सोनोग्राफी करावी लागत आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात गेवराईसह अंबड, माजलगाव, शिरुर तालुक्यातील काही रुग्ण येथे येत आहेत. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी असते. दरमहा सात ते आठ हजार रु ग्ण येथे उपचारासाठी येतात.तसेच प्रसुतीसाठी तालुक्यातून महिला मोठ्या प्रमाणात येतात. प्रसुतीपूर्व तपासण्याही कराव्या लागतात. शिवाय ५० खाटांचे रुग्णालय असल्याने दाखल करावयाच्या अनेक रुग्णांची सोनोग्राफी करावी लागते. यावेळी रुग्णालयात ही सोनोग्राफी मशीन असूनही तीन महिन्यांपासून धूळ खात पडलेली आहे.याबाबत जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने पावले उचलून या ठिकाणी असलेली सोनोग्राफी मशीन सुरू करुन तालुक्यातील महिला रुग्णांचे होणार हाल थांबविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडpregnant womanगर्भवती महिला