शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पित्याचा शब्द पुत्राने निभावला; स्वतःची १६ गुंठे जमीन दान करत वीरशैव स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 17:36 IST

वीरशैवतेली समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने या समाजाची मोठी कुचंबना,व विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या.

अंबाजोगाई-:गेल्या अनेक वर्षांपासून वीरशैवतेली  स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने विविध अडचणी चा सामना वीरशैवतेली समाजाला करावा लागत असे. या स्मशानभूमी लगत असलेली १६ गुंठे शेतजमीन सारंग पुजारी व कुटुंबियांनी दानपत्र देत हा वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लावला.वीरशैवतेली समाजानेही पुजारी कुटुंबियांचा सत्कार करत  ऋण व्यक्त केले

येथील  वीरशैवतेली समाजाच्या वतीने चौभारा परिसरातील विठ्ठलरुक्मिणी मंदिरात पुजारी कुटुंबीयांच्या ऋणनिर्देश समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आ.नमिता मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा,श्रीमती ललीता पुजारी,श्रीमती राजश्री पुजारी,माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,कृष्णा पुजारी,माजी नगरसेवक दिनेश परदेशी, नगरसेविका संगीता व्यवहारे,बालासाहेब पाथरकर, शेख ताहेर,डॉ.निशिकांत पाचेगांवकर, कल्याण काळे,संतोष लोमटे,शंकरराव व्यवहारे,सुनील व्यवहारे,गिरीश हजारी यांची उपस्थिती होती.

वीरशैवतेली समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने या समाजाची मोठी कुचंबना,व विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या.या स्मशानभूमीलगत पुजारी कुटुंबियांची शेतजमीन आहे.शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असतानाही पुजारी कुटुंबीयांनी सामाजिक दायित्व जोपासत आपल्या मालकीची १६ गुंठे शेतजमीन स्मशानभूमीसाठी दान दिली.आता रस्ता उपलब्ध झाल्याने अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत. याचे ऋण व्यक्त करण्यासाठी पुजारी कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ललिता पुजारी व राजश्री पुजारी यांनी दानपत्राचे हस्तांतरण समाजाकडे केले. या वेळी बोलताना सारंग पुजारी म्हणाले की, कोणत्याही समाजाची उपेक्षा होऊ नये.केवळ राजकारण नको तर राजकारणास समाजकारणाची जोड देण्याची शिकवण वडील स्व.नगराध्यक्ष अरुण पुजारी यांच्या कडुन मिळाली.त्यांच्या विचारावरच मार्गक्रमण करून आगामी काळातही  सामाजिक कार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी दिनेश परदेशी,कृष्णा पुजारी,उमाकांत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन बाळासाहेब राऊत यांनी केले.तर उपस्थितांचे आभार नंदकुमार देशमाने यांनी मानले.या कार्यक्रमास वीरशैवतेली समाजातील महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

पित्याने दिलेला शब्द पुत्राने पूर्ण केलास्व.नगराध्यक्ष अरुण पुजारी यांनी वीरशैवतेली समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा देण्यास संमती दिली होती.मात्र तांत्रिक अडचणी व दस्तऐवज यामुळे ही प्रक्रिया रखडली होती.त्यातच अरुण पुजारी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सारंग पुजारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन पित्याने दिलेला हा शब्द पुत्राने पूर्ण केला.

टॅग्स :SocialसामाजिकBeedबीड