शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

..सोमनाथने नववर्ष पाहिलेच नाही !

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

चिमणगावला वादावादीतून हमालाचा खून : नूतन वर्षाला १५ मिनिटे शिल्लक असतानाच झाला घात

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल हा खासगी साखर कारखाना असून, तेथील बहुसंख्य कामे ही हंगामी कामगारांकडून अथवा कंत्राटी कामगारांकडून केली जातात. अवघ्या २४ दिवसांपूर्वी चिमणगावच्या माळावर कामाच्या शोधात आलेल्या सोमनाथ गोलार याच्या ध्यानी, मनी देखील नसेल की आपले आयुष्य या वर्षाअखेरीस संपणार आहे. किरकोळ वादाची किनार असलेल्या प्रकारातून सोमनाथ याचा क्रूरपणे खून करण्यात आला. अवघे ३५ वय असलेल्या सोमनाथने २०१६ हे नवीन वर्ष पाहिलेच नाही, नवीन वर्ष सुरू होण्यास केवळ काही मिनिटे शिल्लक असताना त्याने नाईलाजास्तव या जगाचा निरोप घेतला. गोलार याचे कुटुंबीय हे ऊसतोडणी कामगार आहेत. तो कामाच्या शोधार्थ जरंडेश्वर शुगर मिलवर आला होता. तेथे त्याने कामाची चौकशी केल्यावर ‘हमाली कंत्राटदाराला भेट, ते तुला काम देतील,’ असे सांगण्यात आले आणि तो कंत्राटदाराला भेटला आणि कामावर हजर झाला. अवघ्या आठच दिवसांत त्यांच्याच भागातील संतोष सातपुते हा देखील हमाल म्हणून गोदामावर हजर झाला. एकाच भागातील असल्याने दोघांची सुरुवातीला गठ्ठी जमली; मात्र काही दिवसांतच दारूचे व्यसन दोघांच्या मैत्रीच्या आड आले आणि वादावादी सुरू झाली. त्यातून शिवीगाळ आणि एकमेकांना बघून घेण्याची भाषा सुरू झाली. सातपुते हा तसा खुनशी स्वभावाचा असल्याने इतर हमाल त्याला आवर घालत; मात्र तो ऐकण्याची मन:स्थिती ठेवत नव्हता. ३१ डिसेंबरच्या रात्री त्याने मद्यपान केले आणि त्यातून कोयत्याने गळा चिरून आणि मानेवर वार करून गोलार याचा खून केला. खुनानंतर सातपुते याने इतर हमालांच्या खोल्यांची दारे जोरजोरात ठोठावली आणि कोयत्याने त्यांच्या दारावर रक्त देखील शिंपडले. सातपुते हा खुनानंतर देखील बेभान झाला होता. सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतल्यानंतर तो शांत बसला. (प्रतिनिधी).. वादावादी अन् शुगर मिलकडून मदतीचा हात !सोमनाथ गोलार याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक व गोलार याच्या मित्रमंडळींनी नकार दिला. जरंडेश्वर शुगर मिलने आम्हाला आर्थिक मदत द्यावी आणि मृतदेह बीड जिल्ह्यात नेण्यासाठी शववाहिकेची व्यवस्था करावी, या मागणीसाठी त्यांनी वादावादी केली. मिल व्यवस्थापनातील अधिकारी अथवा कर्मचारी हा विषय अंगाला लावून घेण्यास तयार नव्हता, त्यामुळे वातावरण अधिकच चिघळत चालले होते. पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी हवालदार भीमराव यादव यांना नातेवाइकांना सरव्यवस्थापक राक्षे यांच्याशी भेट घालून देण्यास सांगितले. यादव हे नातेवाइकांना घेऊन तडक राक्षे यांच्या दालनात पोहोचले, तेव्हा राक्षे यांना या विषयाची कल्पना नसल्याचे दिसून आले. राक्षे यांनी नातेवाइकांशी चर्चा करत तत्काळ मृतदेह नेण्यासाठी तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. तसेच ‘तुम्ही अर्ज द्या, तुम्हाला आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करतो,’ असे राक्षे यांनी स्पष्ट करताच सर्वजण दालनातून बाहेर आले आणि वादावादीवर पडदा पडला.