शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आधीच खड्डे त्यात एकाने रस्ताच खोदला, बीड-कडा महामार्गावर प्रवास्यांना मरणयातना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 14:39 IST

अनधिकृतपणे रस्ता खोदल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

- नितीन कांबळेकडा (बीड): आधीच जागोजागी खड्डे पडलेले असताना बीड-कडा राष्ट्रीय महामार्गा दरम्यान एकाने चक्क अनधिकृतपणे खोदकाम केल्याने प्रवास्यांच्या मरणयातनात आणखी भर पडली आहे. गळती शोधण्यासाठी आज सकाळी थेट खोदकाम सुरु केल्याने महामार्गावर बराच वेळ वाहतूक खोळंबा झाला होता.

बीड -कडा-नगर राष्ट्रीय महामार्गावर साबलखेड चिचपूर दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होऊन अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. अनेक वर्षांपासून महामार्गाची दयनीय अवस्था असताना आज सकाळी यावर अनधिकृतपणे खोदकाम करण्यात आले. महामार्ग एका बाजूने जलवाहिनीतील गळती शोधण्यासाठी खोदल्याचे पुढे आले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून यासाठी कसलीच परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती आहे. अनधिकृतपणे रस्ता खोदल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे खोदकाम करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दिपक सोनवणे यांनी केली आहे.

वाहन धारकांची वाढली डोकेदुखी सांगळे हाॅस्पीटल ते गांधी हाॅस्पीटल दरम्यान रस्ता खोदला असल्याने वाहन धारकांना मोठी डोकेदूखी वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर वाहनाच्या रांगा लागत असल्याने अडचण निर्माण झाली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता आर.व्ही. भोपळे यांनी खोदकामासाठी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. 

टॅग्स :Beedबीडhighwayमहामार्ग