शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘आष्टीतील काही नेते सरड्याप्रमाणे रंग बदलून कोलांटउड्या मारणारे..’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 23:47 IST

आष्टीतील काही नेत्यांना सरड्याप्रमाणे रंग बदलण्याची सवय जडली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी कधी या पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारणारे आहेत. भविष्यात आपल्याला राजकारणात वरचढ होणाºया कार्यकर्त्यांवर येथे खोटे गुन्हे दाखल केले जातात. आष्टीला तालीम पाडली तरी पण येणाºया निवडणुकीत आमचाच पहिलवान विजयी होणार असल्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी कडा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

ठळक मुद्देसुरेश धसांचे नाव न घेता धनंजय मुंडे यांची टीका : ‘जुगलबंदी’मुळे जिल्ह्यातील वातावरण तापू लागले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टीतील काही नेत्यांना सरड्याप्रमाणे रंग बदलण्याची सवय जडली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी कधी या पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारणारे आहेत. भविष्यात आपल्याला राजकारणात वरचढ होणाºया कार्यकर्त्यांवर येथे खोटे गुन्हे दाखल केले जातात. आष्टीला तालीम पाडली तरी पण येणाºया निवडणुकीत आमचाच पहिलवान विजयी होणार असल्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी कडा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.माजी मंत्री आ. सुरेश धस यांचे नाव न घेता त्यांनी आपल्या भाषणात त्यांच्यावर जोरदार टीका केली. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत सापडला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिला, केंद्र व राज्य सरकारने अच्छे दिनचे गाजर दाखवून शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला. आष्टीत दोन आमदार असून देखील त्यांनी मतदार संघ भकास केला आहे. त्यातील नवीन झालेल्या आमदाराने आष्टीची चिंता करण्याऐवजी त्यांना परळीचीच चिंता जास्त असल्याचा टोला लगावला.या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे , प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, बापूसाहेब डोके, बाळासाहेब आजबे, तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, डॉ. शिवाजी राऊत, सतीश शिंदे, सय्यद अब्दुलभाई, पोपट गर्जे, गोपाळ धांडे, नामदेव शेळके, शिवाजी डोके, शिवाजी नाकाडे, किशोर हंबर्डे, पांडुरंग चौधरी, दादासाहेब गव्हाणे, काकासाहेब शिंदे, प्रा.बाळासाहेब पवार यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याची जय्यत तयारी केली होती.विधानसभेची तयारीगेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री आ. सुरेश धस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते मुंडे यांच्यात जुगलबंदी चालू आहे.या पार्श्वभूमीवर हा कार्यकर्ता मेळावा होत असल्यामुळे धनंजय मुंडे आणि इतर मान्यवर काय बोलतात, याकडे जिल्ह्याची उत्सुकता लागली होती.‘तालीम’ प्रकरणानंतर भाजपाचे पदाधिकारी सतीश शिंदे हे आजही या मेळाव्याच्या व्यासपीठावर होते.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेPoliticsराजकारण